तो पूल आमचाच , महापालिका अधिकाऱ्यांची कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालया पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण जखमी झाले. यानंतर हा पूल नेमका कोणाचा यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी करण्यात आली. मात्र, या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असल्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे.

पादचारी पुलाची बांधणी आणि देखभाल – दुरुस्ती मुंबई महापालिकेकडून झाली होती. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने पुलाची जबाबदारी घेण्याऐवजी दोन्ही प्रशासनांनी हात वर केले. सुरुवातील पालिकेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप म्हणाल्या होत्या की, या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती. यावर रेल्वे प्रशासनाने हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असल्याचे म्हटले.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती असा दावा केला होता. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या कबुलीनंतर कोसळलेला पूल हा मुंबई महापालिकेचा होता हे स्पष्ट झाले आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती असा दावा केला होता. मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या कबुलीनंतर कोसळलेला पूल हा मुंबई महापालिकेचा होता हे स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेने गोखले पूल दुर्घटना नंतर ३०० पेक्षा अधिक पूलाच ऑडिट केलं होतं , यावेळी हा पूल चांगला असून फक्त दुरुस्ती सुचवण्यात आल्या होत्या, मात्र गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने केलेल्या ऑडिटवर ही प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे.