आयुक्त अजॉय मेहता यांनी चांगले काम करावे अन्यथा : नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चांगल्या पदाच्या हट्टापायी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. मेहता यांनी चांगले काम करावे अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ झालेल्या पादचारी पुलाच्या दुर्घटनेमुळे त्यांनी ही मागणी केली आहे.

गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळला, यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जखमी आहेत. दरम्यान, नितेश राणे यांनी मनपा आयुक्त अजॉय मेहता यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी चांगल्या पदावर जाण्याचे स्वप्न पाहणारे अजॉय मेहता मुंबईकरांना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मेहतांना फक्त चांगल्या पदाची अपेक्षा आहे त्यामुळे महापालिका प्रशासन कारभाराकडे ते लक्ष देत नसून मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभाराला अजॉय मेहताच जबाबदार आहेत. त्यामुळे चांगले काम करावे अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

इतकेच नव्हे तर, नितेश राणे यांनी याच मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. पेंग्विनकडे विशेष लक्ष आणि नाईट लाईफचा मुद्दा लावून धरण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका का करत नाही ?, असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. पुन्हा तेच आरोप-प्रत्यारोप आणि पुलाचे ऑडिट करण्याच्या घोषणा होतील, पण ठोस काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेला मनुष्यजीवाची काहीच किंमत नाही काय, असा टोलाही त्यांनी लगावला. याचबरोबर कमला मिल, एलफिन्स्टन ब्रिज आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान अनेकदा छोट्या अधिकाऱ्यांचेच बळी दिले जातात. त्यांच्याऐवजी महापालिका आयुक्तांना जबाबदार का धरले जात नाही. तसेच महापौरांना राजीनामा का द्यायला सांगत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ह्याहि बातम्या वाचा –

होय हिंदुत्ववादी पक्षाचा मला अभिमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 एप्रिलपासून जेवण बनवणं अन् गाडी चालवणं होणार महाग

पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

मोठी बातमी ! ‘हिमालय’पूल आता दिसणार नाही

गडकरी यांनी घेतली मनोहर जोशींची भेट

You might also like