ब्राझीलीयन विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरणी ‘या’ संस्था अध्यक्षाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील उच्चभ्रू कफ परेड येथे ब्राझीलीयन विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कफ परेड रेडीसन्स असोसिएशनच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे.

पद्माकर नांदेकर (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

युथ एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत पिडीत तरुणी भारतात वास्तव्यास आली. ती नांदेकर यांच्याकडे राहात होती. दरम्यान १५ एप्रिल रोजी नांदेकर यांनी तिला दक्षिण मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलवले. त्यावेळी त्यांनी तिला कोल्ड ड्रिंक पिण्यास दिले. त्यानंतर ती बेशुध्द झाली. दरम्यान सकाळी शुध्दीवर आल्यावर ती हॉटेलच्या एका खोलीत होती. सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने वांद्रा येथे एका दुसऱ्या पालक कुटुंबियांकडे गेली. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या मदतीने तिने कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Loading...
You might also like