Mumbai Cyber Police | मुंबई पोलिसांकडून बनावट ‘ई-विमा पॉलिसी’ विकणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे, ही टोळी अनेक प्रमुख कंपन्यांच्या बनावट विमा पॉलिसी (fake insurance policies) विकण्याचे काम करत होती आणि विम्याच्या नावावर लोकांची फसवणुक केली जात होती. एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. (Mumbai Cyber Police)

 

फसवणुक झालेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीनुसार, जून 2020-मार्च 2021 च्या दरम्यान लॉकडाऊन कालावधीत, विमा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणार्‍या काही व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना जास्त लाभाच्या प्रस्तावांचे आमिष दाखवले.

 

या सायबर गुन्हेगारांचे (Cyber Crime) जाळे महाराष्ट्र, तेलंगना, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली राज्यात पसरलेले आहे (Maharashtra, Telangana, Uttar Pradesh, Haryana and Delh). आरोपींची नाव भारती एक्सा इन्श्युरन्स (Bharti AXA) चे बानी सिंह (Bani Singh), विजय मेहता (Vijay Mehta) आणि पीएनबी मेटलाईफ इन्श्युरन्स (PNB MetLife Insurance) चे दीपक दुबे (Deepak Dubey), स्नेहा आणि पूजा (Sneha and Pooja) अशी आहेत.

 

या आरोपींना तक्रारदाराला एक ऑनलाइन पॉलिसी विकली आणि भारती एक्साच्या कथित ईमेलवरून पॉलिसीचे कागदपत्र पाठवले. त्यांना मेल पाठवून दावा करण्यात आला की, ते हैद्राबादमध्ये आयआरडीएचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. (Mumbai Cyber Police)

 

या गुन्हेगारांनी तक्रारदाराला 71.87 लाख रुपयांचा लाभ, सोबतच 12 लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्ज, आजीवन पेन्शनचे आमिष दाखवत त्याच्याकडून 18.98 लाख रुपये जमा करण्यास जबरदस्ती केली.

 

 

 

फसवणुकीची जाणीव होताच पीडित व्यक्तीने मुंबई सायबर पोलीस (Mumbai Cyber Police), उत्तर क्षेत्र यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी प्रकरणाचा तपास केला. तपासात किमान पाच राज्य – दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगना, महाराष्ट्रात पसरलेल्या मोठ्या घोटाळ्याचा खुलासा झाला.

 

या सायबर गुन्हेगारांनी मोबाइल कार्डच्या किरकोळ विक्रेत्यांकडे जमा केलेल्या
कागदपत्रांचा गैरवापर करून प्रत्यक्षातील ग्राहकांच्या नावावर मिळवलेल्या बनावट सिम कार्डचा (Fake SIM Card) वापर केला.

 

आतापर्यंत पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे आणि कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
आणि आयसीआयसीआय बँकेतील (ICICI Bank) दोन खाती गोठवण्यात आली आहेत.
सोबतच मोबाइल फोन आणि अनेक बनावट सिम कार्ड जप्त केली आहेत.

 

सायबर पोलिसांना हे सुद्धा समजले की, काही आरोपींविरूद्ध लखनऊ, यूपी आणि इतर ठिकाणी सुद्धा अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत
आणि अशाप्रकारच्या बनावट ऑनलाइन विमा पॉलिसी विकणार्‍या इतर
राज्यांतील टोळ्यांशी कनेक्शनचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Cyber Police)

 

Web Title :- Mumbai Cyber Police | mumbai cyber police busts interstate gang selling fake e insurance policies marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा