‘देवेंद्र फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करतायेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्यानंतर देशात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली. यावरून भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडिओच्यामाध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वादग्रस्त घोषणा देण्यात येत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेला व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत काँग्रेसने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील भाजपची सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस निराश झाले आहेत. सत्य पाहिल्याशिवाय वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यांनी आधी व्हिडीओची चौकशी करायला हवी होती असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करत आहेत. हे खूप दु:खदायक आहे. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने या व्हिडिओचे सत्य जाणून घेयला हवे होते. माजी गृहमंत्री आणि विधानसभेच्या जबाबदार विरोधी पक्षनेत्याने अशी खोटी माहिती शेअर करू नये, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे केले आहे. दरम्यान एएमयूच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवासांपूर्वी नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार संघर्ष झाला होता. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/