दिसायला सामान्य ‘झोपडपट्टी’सारखी दिसते, पण एका झोपड्याची किंमत 1 कोटी रुपये आहे, का ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज देशातील अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. यातील एक म्हणजे मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा परिसर. या परिसरास आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखले जाते. मुंबईची धारावी झोपडपट्टी सुमारे 613 हेक्टर जागेवर वसली आहे आणि येथे जास्त करून दैनंदिन मजुरी करणारे व छोटे व्यावसायिक राहतात. या भागात 22 हजाराहून अधिक लोक व्यवसाय करतात आणि एकट्या या क्षेत्राची उलाढाल 10 कोटींपेक्षा जास्त आहे. येथील झोपडीची किंमतही आता कोट्यवधी रुपयांवर पोहोचली आहे.

जेव्हा ब्रिटिश भारतावर राज्य करत होते तेव्हा 1862 मध्ये ब्रिटीशांनी त्यांच्या इमारती बांधकामांसाठी आणि इतर कामांसाठी येथे कामगार वर्गातील लोकांना वसवले होते आणि तेव्हापासून इथले अरुंद रस्ते या मजुरांची ओळख बनले.

वाढत्या लोकसंख्येमुळे येथे बर्‍याच झोपडपट्ट्या उभारल्या गेल्या आहेत आणि या झोपड्यांची घनता इतकी वाढली आहे की वरुन पाहिल्यास आसपासची जमीन देखील दिसत नाही. धारावीतील एका झोपडपट्टीची किंमत 1 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. येथे आता 1 चौरस फुटाची किंमत 25,000 ते 30,000 च्या आसपास पोहोचली आहे. दिसायला तर सामान्य झोपडपट्टीसारखी दिसते, परंतु त्यात अनेक खोल्या आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात.