Mumbai Diaries 26/11 Teaser : मुंबई डायरीज 26/11 चा टीजर रिलीज ! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार वेब सीरिज

पोलीसनामा ऑनलाइन – निखिल अडवाणी (Nikkhil Advani) नं निर्मिती केलेल्या मुंबई डायरीज 26/11 (Mumbai Diaries 26/11) या वेब सीरिजचा फर्स्ट लुक व्हिडिओ टीजर सोशलवर रिलीज करण्यात आला आहे. कामा हॉस्पिटलमधील हत्याकांडावर याचा फोकस आहे. यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, आणि श्रेया धन्वंतरी हे प्रमुख भूमिकेत आहेत. आधी याचं टायटल बॉम्बे डायरीज होतं. मार्च 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime Video) ही सीरिज रिलीज होणार आहे.

रिलीज झाला फर्स्ट लुक व्हिडिओ (टीजर)

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर रोजीच्या हल्ल्याची घटना आज 12 वर्षांनंतरही लोकांच्या मनात ताजी आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियानं या हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आतंकवाद्यांशी दोन हात करणाऱ्या हिरोंच्या धाडसाला सलाम केला आहे. या मेडिकल ड्रामा सीरिजचा फर्स्ट लुक व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबई डायरीज 26/11 या वेब सीरिजचं डायरेक्शन निखिल अडवाणी, निखिल गोंजालविस यांनी मिळून केलं आहे.

मुंबई डायरीज 26/11 ही वेब सीरिज 200 देश आणि क्षेत्रात अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज केली जाणार आहे. 26/11 च्या हल्ल्यात घायाळ लोकांचा जीव वाचवण्यासाठी न थकता काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफची स्टोरी यात दाखवण्यात येणार आहे.

You might also like