Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

मुंबई (mumbai ): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Mumbai : परदेशी मुत्सद्दींच्या नावाने भारतात जपान, इंग्लड आणि युएईमधून परदेशी लक्झरी कार (Overseas Luxury Car) मागून त्या नंतर इतरांना विकल्याचे प्रकरण डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्टचे (Director of Revenue Intelligent) उघडकीस आणले आहे. याप्रकरणी गुरुग्राम (Gurugram) स्थित लक्झरी कार डिलर बिग बॉय टोयझेचे (Luxury Car Dealer Big Boy Toyze) मुख्य कार्यकारी अधिकारी निपुन मिग्लानी (Executive Officer Nipun Miglani) आणि इतर दोघांना अटक (Arrested) करण्यात आल्या आहेत. एजन्सीने एकूण ६ लक्झरी कारही ताब्यात घेतल्या आहेत.

डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्टने सात शहरांमध्ये केलेल्या मोन्टे कार्लो  (Monte Carlo) नावाच्या डीआरआय ऑपरेशन (DRI Operations) राबविण्यात आले. त्यातून हा डिप्लोमॅट लक्झरी कारच्या  तस्करीचा (Diplomat Luxury Car Smuggling) पर्दाफाश केला गेला आहे.
परदेशी वकालतीतील राजदूत व अन्य अधिकार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना परदेशातून करण्यात आलेल्या सर्व आयात वस्तूंवर सीमा शुल्कात सवलत दिली जाते. त्याचा या रॅकेटने गैरफायदा घेतला.
परदेशातून लक्झरी कार आयातीवर एका वाहनाच्या मुळ किंमतीवर २०४ टक्के सीमा शुल्क आकारले जाते. त्यावर जीएसटी २८ टक्के आणि १२.५ टक्के सरचार्ज आकारला जातो.

अशा प्रकारे गेल्या ५ वर्षांमध्ये २० हून अधिक लक्झरी वाहने परदेशी वकालतीच्या अधिकार्‍यांच्या नावावर मागविण्यात आली. त्यानंतर त्या कार खासगी व्यक्तींकडे वळविण्यात आल्या. त्यात तब्बल २५ कोटी रुपयांहून सीमा शुल्क चुकविण्यात आले आहे. तस्करी करणार्‍या या रॅकेटचा मुख्य सुत्रधार हा दुबईचा रहिवासी आहे. त्याच्यावर चोरीचे इतरही काही खटले दाखल आहेत.

इंग्लड, जपान आणि युएई येथून मुसद्दींच्या नावाने लक्झरी कार आयात करण्यात आल्या.
मिग्लानी याने या कार बिग बॉय टोयझे या शोरूमच्या नावावर मागविण्यात आल्या.
या गाड्यांचे महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील आरटीओकडे रजिस्टेशन करण्यात आले.
त्यानंतर त्या कार भारतीय खरेदीदारांना विकून मोठा फायदा मिळविताना शासनाचा महसुल बुडविला.

महसुल विभागाने ( Revenue Department) मुंबईतील अंधेरी येथील शोरुममधून ६ कार जप्त केल्या आहेत.
तपासात अफ्रिकन देशातील एका दिल्लीस्थित मुसद्दीच्या नावावर एक कार मागविण्यात आली होती.
ती अंधेरीच्या शोरुममध्ये ठेवण्यात आली होती.

Web Title :  Mumbai: Directorate of Revenue Intelligence busts luxury car smuggling racket involving use of diplomatic privileges. 3 people incl CEO of a Gurugram based luxury car dealership arrested.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात पतीचा खून करुन फासावर लटकवले; अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीनं सांगितलं सर्व काही

Pooja Chavan Suicide Case | पुजा चव्हाण प्रकरणात माजी मंत्री राठोड यांना क्लिन चीट?
पुजाच्या आई-वडिलांनी नोंदवला जबाब,
मंत्री पदासाठी हालचाली? जाणून घ्या नेमका काय जबाब नोंदवलाय पुजाच्या आई-वडिलांनी