मुंबई : ४ मजली इमारत कोसळून आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू, २ लहान मुलांना वाचवण्यात यश (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत आज एक मोठी दुर्घटना घडली. डोंगरी भागातील चार मजली इमारत कोसळूस ४२ ते ४५ लोक या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली गाडल्या गेल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. पोलीस अग्नीशमन आणि एनडीआरएफची टीम सध्या बचाव कार्य करत आहे. ढीगाऱ्या खाली दबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याला स्थानिक लोक देखील मदत करत आहे. भीषण दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन लहान मुलाला जीवंत वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

जेव्हा इमारत कोसळली तेव्हा ढिगाऱ्याखाली अनेक लोक जिवंत गाडले गेले आहेत. इमारत कोसळलेला परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे त्यामुळे बचाव पथकाला ढिगाऱ्याखालून लोकांना वाचवताना अनेक अडचणी येत आहेत. या दरम्यान चमत्कारीत रित्या दोन लहान मुलाला ढिगाऱ्या खालून जिवंत बाहेर काढ्यात आले.

मुलाची तब्येत ठीक असेल अशी आशा आहे. असे असले तरी सध्या त्या लहान मुलाची परिस्थिती काय आहे यावर आधिक माहिती मिळाली नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की ही इमारत जवळपास १०० वर्ष जुनी आहे. यात जवळपास १५ कुटूंब राहतात.

आतापर्यंत दोन मृत महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच २ लहान मुलांसह तीन जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. कोसळलेली कौसर इमारत ही म्हाडाची असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी