डॉ. पायल तडवी प्रकरण : उच्च न्यायालय आरोपींच्या सुनावणीची करणार ‘व्हिडिओ’ रेकॉर्डिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. पायल तडवी प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणी आता सुसाइड नोट समोर आली आहे. यात तिने हे पाऊल उचलत असल्याने आई वडिलांची माफी मागितली आहे. मी एक चांगली डॉक्टर बनू इच्छित होते, परंतू लोकांना मला बनू दिले नाही. त्रास सहन करण्याची सहनशक्ती संपली आहे. मला प्रत्येक वेळी त्रास दिला जात आहे. प्रत्येक काम करण्यापासून रोखले जात आहे.

आरोपींच्या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डींग होणार

मुंबई उच्च न्यायालयाने गुुरुवारी आपल्या रजिस्ट्री विभागाला तीन वरिष्ठ डॉक्टरांची जामीन याचिकेवर होणाऱ्या सुनावणीच्या व्हिडिओग्राफीची व्यवस्थानिर्देश करण्याचा आदेश दिला आहे. या डॉक्टरांना रुग्णालयात आपल्या कनिष्ठ सहकार्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

न्यायधीश डी.एस. नायडू, हेमा आहूजा, भक्ति मेहर आणि अंकिता खंडेलवाल जामीन याचिकेवर सुनवाणी करत होते. या तिन्ही आरोपींनी जातीवरुन बोलल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या शिवाय आपल्या सहकारी पायल तडवी यांना आत्महत्या करण्यात प्रवृत्त करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.

आरोपींची बाजू मांडताना उपस्थित अधिवक्ता आबाद पोंडा यांनी सांगितले की, ही तरतूद फक्त सुनावाणी साठी आहे ना की जामीनाच्या सुनावणीसाठी आहे. यानंतर उच्च न्यायालयच्या रजिस्ट्री विभागाला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिला आणि जामीन याचिकांवर पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त