Mumbai Drug Case | वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला गोप्यस्फोट; जाणून घ्या पत्रात?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Mumbai Drug Case | एनसीबीचे समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्याबाबत मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या कारवायांसदर्भात एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली (Mumbai Drug Case) आहे.

 

ट्विट करत मलिक यांनी हे पात्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, एनसीबीमधील (Mumbai Drug Case) एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर येथे आहे.
एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे.
आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

 

पत्र प्रसिद्ध केल्यानंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंवर पुन्हा एकदा टीका केली. मलिक म्हणाले, काही बोगस अधिकाऱ्यांची टोळी एनसीबीमध्ये तयार झाली आहे.
हि टोळी लोकांना ड्रग्सच्या केसमध्ये फसवते. अशा २६ केसचा या पत्रामध्ये उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याच्या दाव्याचा नवाब मलिक यांनी पुनरुच्चार केला आहे.
वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून एका गरजू मागासवर्गीय उमेदवाराचा नोकरीचा हक्क हिरावला आहे.
यासंदर्भात जातवैधता समितीकडे (Mumbai Drug Case) तक्रार करणार आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना एनसीबीच्या अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रामध्ये वानखेडेंनी हाताळलेल्य ड्रग्स प्रकरणाती २६ प्रकरणाचा उल्लेख आहे.
एनसीबीचे आधीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी अमित शाहांना सांगून नियमबाह्य पद्धतीने समीर वानखेडे यांना झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केले.
एवढेच नाही तर सर्व मार्ग अवलंबुन बॉलिवूडला ड्रग्सच्या प्रकरणात अडकवण्याचा आदेश समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना दिले.
इतकेच नाहीत समीर वानखेडे हे एक खंडणीखोर अधिकारी आहेत. त्यांना प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहणे त्यांना आवडते, असा दावाही या पत्रात (Mumbai Drug Case) करण्यात आला आहे.

 

Web Title : Mumbai Drug Case | mumbai drug case nawab maliks letter bomb sameer wankhede big secret blast about special 26

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bank Holidays November 2021 | नोव्हेंबरमध्ये पूर्ण 17 दिवस बंद राहणार बँका! कामासाठी जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची यादी

Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांकडून 24 किलो चरस जप्त, 2 महिलांसह चौघांना अटक

Gold Price Today | खूशखबर ! सोन्याचे दर पुन्हा उतरले; 8059 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या