क्राईम स्टोरीमुंबई

Mumbai Drug Case | समीर वानखेडेंच्या वडिलांसंदर्भात नवाब मलिकांकडून आणखी एक पुरावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्ज प्रकरणावरून (Mumbai Drug Case) एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद काही मिटायचे दिसत नाही. आता तर नवाब मलिक यांनी थेट वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. मात्र हा दावा समीर वानखेडेंच्या वडिलांनी फेटाळला होता. तदनंतर नवाब मलिक यांनी दाऊद वानखेडेंच्या फेसबूक प्रोफाइलचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये समीर वानखेडेंच्या वडिलां सारख्या दिसणाऱ्या फोटोखाली वानखेडे दाऊद असे नाव लिहिलेले या प्रोफाईलमध्ये दिसत आहे. त्यावरून मलिक यांनी हा दाऊद वानखेडे कोण अशी विचारणा केली आहे. दरम्यान तत्पूर्वी मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे असं असून, त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला (Mumbai Drug Case) होता.

कोण आहेत समीर वानखेडे

समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती.
त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले होते.
अमली पदार्थांचा छडा लावण्यात वानखेडे तज्ज्ञ असल्याचे मानले जाते.
त्यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला (Mumbai Drug Case) आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीचा खून झाल्यानंतर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mumbai Drug Case | mumbai drug case sameer wankhedes fathers name dawood wankhede another proof given nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Back to top button