Mumbai Drugs Case | नवाब मालिकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘निशाणा’; अमृत फडणवीस यांचा फोटो शेअर करत केला ड्रग पेडलरसोबत ‘कनेक्शन’ असल्याचा आरोप

मुंबई : Mumbai Drugs Case | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे एनीसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत. दरम्यान, आता नवाब मलिक यांनी आपला पूर्ण निशाणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (former Maharashtra Chief Minister and BJP leader Devendra Fadnavis) यांच्याकडे वळवला आहे. (Mumbai Drugs Case)

 

 

 

मलिक यांनी दावा केला की, देवेंद्र फडणवीसांचे ड्रग तस्करांशी संबंध (Devendra Fadnavis had links with drug smugglers) आहेत. मलिक यांनी एससी आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांना सुद्धा निशाण्यावर घेतले आणि प्रश्न विचारला की ते वानखेडे यांच्या घरी का गेले?

Pune Crime | ‘वरण भाताच्या कुकर’ने घरात ‘रामायण’, ‘महाभारत’ ! जावयाला सासरकडच्यांनी बेदम चोपले; जाणून घ्या प्रकरण

नवाब मलिक यांनी म्हटले की, जयदीप राणा (Jaideep Rana) नावाचा व्यक्ती ड्रग तस्करीशी संबंधीत प्रकरणात (case related to drug trafficking) सध्या जेलमध्ये बंद आहे. या व्यक्तीचे भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कनेक्शन आहे. मलिक यांनी सांगितले की, जयदीप राणा हा फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Fadnavis’ wife Amrita Fadnavis) यांच्या एका प्रसिद्ध गाण्याचा फायन्शियल हेड होता. इतकेच नव्हे, मलिकांनी हा सुद्धा आरोप केला की फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात ड्रगचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढला. (Mumbai Drugs Case)

 

 

नवाब मलिक यांनी म्हटले, काल राष्ट्रीय अनुसूचित जारी आयोगाचे चेयरमन आणि भाजपाचे अरुण हलदार (BJP’s Arun Haldar) समीर वानखेडे यांच्या घरी गेले आणि त्यांना क्लीन चिट दिली. त्यांनी अगोदर तपास केला पाहिजे होता आणि सविस्तर अहवाल जमा केला पाहिजे होता. आम्ही त्यांची तक्रार राष्ट्रपतींकडे करू.

 

 

 

2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला निघालेल्या एका क्रुझवर होत असलेल्या रेव्ह पार्टीच्या दरम्यान एनसीबीच्या टीमने समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात छापेमारी केली होती.
या बाबतीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan’s son Aryan Khan) ला सुद्धा अटक केली होती.
यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यास सुरूवात केली होती.

नवाब मलिक यांनी सर्वप्रथम वानखेडे यांचा जन्माचा दाखला जारी करत दावा केला होता की, ते जन्मापासून मुस्लिम आहेत.
परंतु नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी बनावट जातीचा दाखला बनवला.
हे आरोप सिद्ध करण्यासाठी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा आणि छायाचित्र सुद्धा जारी केले होते.
मात्र, समीर वानखेडे यांनी हे आरोप नाकारले.
त्यांचे म्हणणे आहे की त्यांचे वडील दलित आणि आई मुस्लिम होती.

हे देखील वाचा

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाचे लाच प्रकरण ! पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) वडगाव मावळमध्ये मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mumbai Drugs Case | after sameer wankhede now nawab malik attacks bjp leader devendra fadanvis and his wife amruta for having alleged connection with a drug peddler

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update