Mumbai Drugs Case | आणखी एक मोठा ट्विस्ट ! समीर वानखेडेंवर NCB अधिकाऱ्याचा गंभीर आरोप; मलिकांना निनावी पत्र पाठवत, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Drugs Case | मुंबई ड्रग्ज प्रकरणावरुन (Mumbai Drugs Case) अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या मुंबई कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यानं एनसीबीचे संचालक समीर वानखेडेविरोधात (Sameer Wankhede) पाठवलेले पत्र मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रसिद्ध केल्याने मोठी खळबळ माजली आहे. या पत्रातून समीर वानखेडे यांच्यावर एनसीबी अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाला आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

 

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी तपास केलेल्या 26 खटल्यांवर सवाल उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर, समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. त्यासाठी समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे. तसेच बनावट केस उभ्या करण्यासाठी समीर वानखेडे यांनी एक टीम उभी केलीय. त्यात सुपरिटेंडेंट विश्वविजय सिंह, आयोएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मीणा, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय अनिल माने आणि समीर वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे. असं नवाब मलिक (Nawab Malik) यांना पाठवलेल्या या पत्रात संबधित अधिकारीने (Mumbai Drugs Case) सांगितलं आहे.

त्याचबरोबर, समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्यांच्या काही हस्तकांकडून ड्रग्स (Drugs) खरेदी  करतात आणि बनावट केस उभ्या करतात,
असाही आरोप पत्रातून करण्यात आला आहे. समीर वानखेडेंच्या हस्तकांची नावे ही दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद, शेख, नासिर, आदिल उस्मानी अशी आहेत.
तसेच, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे आणि विष्णू मीणा, ड्रायव्हर अनिल माने हे कुणाच्याही घरी तपास सुरू
असताना ड्रग्स ठेवायचे आणि संबंधितांवर खोटी केस दाखल करतात. जर कुणाच्याही घरी ड्रग्स सापडला
तर त्याचे प्रमाण अधिक दाखवून जामीन मिळू नये म्हणून त्याला व्यावसायिक ड्रग्सचे प्रकरण बनवायचे.
तर आयओएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी जेआयओ सुधाकर शिंदे नकली पंचनामे रंगवायचे.
हे पंचनामे एनसीबीच्या कार्यालयातच तयार केले जात. असंही पत्रातून सांगण्यात (Mumbai Drugs Case) आलं आहे.

 

Web Title :- Mumbai Drugs Case | mumbai drugs case drug purchase peddlers fake cases serious allegations against ncb officer sameer wankhede

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Post Home Loan | आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून सुद्धा मिळेल होम लोन, जाणून घ्या सविस्तर माहिती

7th Pay Commission | अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून केला लागू

Fake Tea Leaf Detection | तुम्ही बनावट चहापत्तीचे सेवन करत आहात का?, ‘या’ अतिशय सोप्या ‘ट्रिक’ने घरबसल्या जाणून घ्या