Mumbai Drugs Cases | राज्यातील ‘त्या’ महत्त्वाच्या 5 ड्रग्जच्या केसेस NCB कडे वर्ग करा – गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mumbai Drugs Cases | केंद्रीय अमंली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) अंतर्गत सध्या अनेक केसेस सुरु आहेत. दरम्यान, राज्य आणि केंद्रात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आता एनसीबीच्या महासंचालकांनी (NCB DG) राज्याच्या महासंचालकाला (Maharashtra DGP) केसबाबत पत्र पाठवलं आहे. तर या पत्रामध्ये राज्यातील महत्त्वाच्या 5 ड्रग्जच्या केसेस एनसीबीकडे वर्ग करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्याची माहिती समोर येते. (Mumbai Drugs Cases)

 

एनसीबीच्या पत्रानंतर पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य (Center vs State) सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर एनसीबीच्या महासंचालकाकडून केसेस वर्ग करण्यासाठी राज्याच्या महासंचालकांना पत्र गेले असल्याचे समजते. (Mumbai Drugs Cases)

 

एनसीबीने दिलेल्या पत्राबाबत मुंबई पोलीस (Mumbai Police) विचार करीत आहेत. मात्र, पत्रात नेमक्या कोणत्या केसेस हव्या आहेत, याची माहिती दिलेली नाही. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर, मुंबई पोलिसांच्या ANC विभागाकडे 50 ते 70 टक्के गुन्हे हे परराज्याशी संबधित आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या गुन्ह्यांची माहिती एनसीबीला पाहिजे, याबाबत अस्पष्टता आहे. या मुद्द्यावरुन मुंबई पोलीस अधिकारी चर्चा करीत आहेत.

दरम्यान, ज्या पद्धतीने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) कोणत्याही राज्यातील गुन्हा केंद्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्याचे अधिकार नाहीत.
त्याप्रमाणे ते NCB ला नाहीत, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे हे गुन्हे वर्ग करायचे की नाही,
याबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कायदेतज्ञांची मदत घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

Web Title :- Mumbai Drugs Cases | nawab malik has objected to the handing over of drug cases under the Maharashtra government to the center after amit shah order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA न्वये CP अमिताभ गुप्तांकडून 47 जणांवर कारवाई

LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा

Pune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली ‘धमकी’ ! पुण्यातील तरूणानं जीवन संपवलं, मामा अन् भाचीवर FIR; सुसाईड नोट सापडली अन्…