माजी आमदार नरेंद्र पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, लवकरच भाजपावासी होणार!

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन 

माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. पाटील यांनी पक्ष सदस्यत्व आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला. तेव्हा पाटील हे डावखरेंसोबत भाजपा मुख्यालयात गेले होते. तेव्हाच पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या फेटाळून लावल्या होत्या.
[amazon_link asins=’B071JWBFDT,B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5180f3f0-b039-11e8-a7aa-ad1446de72a0′]
नुकत्याच जाहीर झालेल्या महामंडळ नियुक्त्यांमध्ये नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील अार्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा रंगल्या होत्या.

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. मुख्यमंत्री माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविणार असतील तर त्यांच्या घरची भांडी घासायला तयार असल्याचे वक्तव्य त्यांनी दोनवर्षांपूवीच केले होते. तेव्हापासूनच त्यांची भाजपाजवळीक दिसून आली होती. पाटील यांना भाजप नेत्यांनी एेरोली विधानसभा किंवा सातार जिल्ह्यातील पाटण मतदारसंघ देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री जेव्हा एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी सानपाडा येथे आले तेंव्हा पाटील यांच्या घरी पाहूणचार घेतला होता. त्यामुळे पाटील आज ना उद्या भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चात फूट महिलांकडून स्वतंत्र समितीची स्थापना