मुंबईत नौदलाच्या निवृत्त अधिकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. यापूर्वी समता नगर पोलिसांनी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे.

कमलेश कदम यांच्या व्यक्तिरिक्त आणखी एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे नाव संजय मांजरे आहे. माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी घटनेविषयी सांगितले की, आज ८-१० जणांनी माझ्यावर हल्ला केला आणि मारहाण केली. यापूर्वी मला एका संदेशासाठी धमकीचे कॉल आले, जे मी फॉरवर्ड केले होते. मी आयुष्यभर देशासाठी काम केले आहे. असे सरकार अस्तित्वात असू नये.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेव्हीच्या माजी अधिकाऱ्याला ओढत घराबाहेर आणले आणि त्यांना मारहाण करताना दिसत आहे.

असे सांगितले जात आहे की, शिवसेनेचे कार्यकर्ते यामुळे नाराज होते कि माजी नौदल अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असा फोटो व्हाट्सएपवर फॉरवर्ड केला होता, ज्यामध्ये छेडछाड केली गेली आणि शिवसैनिकांना तेच आवडले नाही.

भाजपचा उद्धव सरकारवर हल्ला
दुसरीकडे या घटनेवरून भाजप उद्धव सरकारवर हल्ला करत आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट केले की व्वा शिवसेना. एका वयोवृद्ध सेनापतीवर हल्ला करुन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा किती सन्मान वाढवला? तुम्ही खरोखरच ‘वाघ’ आहात.

पात्रापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केले की, नौसेनेच्या माजी अधिकाऱ्याला गुंडांनी फक्त व्हाट्सएपवर मेसेज फॉरवर्ड केल्यामुळे मारहाण केली. उद्धव ठाकरे या गुंडाराजला थांबवा. आम्हाला कठोर कारवाई पाहिजे आणि या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे.