मुंबईतील प्रसिद्ध ‘रेड लाईट एरिया’ सोडून ‘या’ ठिकाणी जात आहेत ‘सेक्स वर्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील प्रसिद्ध रेड लाईट एरिया कामठीपुरा सोडून अनेक सेक्स वर्कर इतर जवळपासच्या भागात स्थलांतरित होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार कमी उत्पन्न आणि वाढत्या रिअल इस्टेटच्या किंमतींमुळे वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना कामठीपुरा सोडण्यास भाग पाडले जात आहे. एका सेक्स वर्करने सांगितले की, तिच्यासोबत काम करणार्‍या बर्‍याच महिला मुंबई उपनगरामध्ये राहायला आल्या आहेत.

एएनआयच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार आरती नावाच्या एका सेक्स वर्करने सांगितले की, कामठीपुरामध्ये आयुष्य जगणे कठीण होत आहे. ती सध्या ठाण्यातील कडावली येथे राहते. त्यामुळे तिला कामठीपुरा पर्यंत लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. आरती म्हणाली की, तिलाही कुटुंबाचा सांभाळ करावा लागत असल्याने उत्पन्न कमी पडते. त्याचवेळी, दुसर्‍या सेक्स वर्करने सांगितले की, त्याच्याबरोबर काम करणार्‍या बर्‍याच महिलांनी आता कडवली, कल्याण आणि आसपासच्या भागात राहण्यास सुरुवात केली आहे.

‘सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज इंटिगेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक विनय वत्स यांचे म्हणणे आहे की, कामठीपुरामध्ये अत्यंत कमी उत्पन्न असणारे अनेक लैंगिक कामगार आहेत. बर्‍याच महिलांना येथील महागडे भाडे परवडत नसल्याने त्या नालासोपारा, तुर्भे आणि वाशी यासारख्या ठिकाणी राहायला गेल्या आहेत. विनय पुढे म्हणाले की, १९९० च्या दशकापासून ते वेश्यांसोबत काम करत आहेत. परंतु मागील २० वर्षात भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता तुम्हाला येथे महिन्याला १५ हजार रुपये भाडे द्यावे लागते. कामठीपुरा मध्य मुंबईत येत असल्याने आणि आजूबाजूच्या व्यावसायिक ठिकाणी वाढ झाल्यामुळे येथील भाड्यात बरीच वाढ झाली आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर देखील सध्या या ठिकाणांवर लक्ष ठेवून आहेत.

लैंगिक कामगारांच्या विषयावर काम करणारे अभिनेता जे ब्रॅंडन हिल म्हणाले की, येथे राहणाऱ्या महिलांना भाड्याने घेतल्यामुळे इतर ठिकाणी शिफ्ट व्हावे लागते हे खूप वाईट आहे. ते म्हणाले की, आगामी काळात ही परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. कामठीपुरा हा देशातील दुसर्‍या क्रमांकाचा रेड लाईट क्षेत्र मानला जातो. सुमारे २० वर्षांपूर्वी येथील सेक्स वर्कर ची संख्या ५०,००० पर्यंत होती. परंतु त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांची संख्या कमी झाली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like