गावातून बॉयफ्रेन्ड बरोबर पळून गेल्यानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा बापाकडून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशच्या एका मुलीची हत्या तिच्याच वडिलांनी मुंबईत केली आहे. मिनाक्षी चौरसिया असं या मुलीचे नाव आहे. ती २० वर्षांची होती. तिने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे या रागात तिच्याच वडिलांनी म्हणजे राजकुमार चौरसिया यांनी तिची हत्या केली आहे. मुंबई पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

मिनाक्षीने २६ वर्षीय ब्रिजेश चौरसिया या मुलाशी लग्न केले होते. त्यातून ती ४ महिने गर्भवती होती. ही आनंदवार्ता आपल्या गावाला जाऊन सांगण्याची तीची इच्छा होती. परंतू तिच्या वडिलांनी याला विरोध करत तिची हत्या केली.

मिनाक्षीला तीच्या वडिलांनी शनिवारी रात्री मुंबईच्या घाटकोपर येथे बोलवून घेतले आणि तिथे तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. दुसऱ्या दिवसी सकाळी मिनाक्षीचे शव पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीसांना या संबंधी मिनाक्षीच्या नवऱ्याची चौकशी केली. तसंच त्यांच्या गावीही चौकशी केली. तर तिच्या वडिलांनी मिनाक्षीला भेटल्याचे सांगितले नाही. मात्र त्यांच्या फोन लोकेशनवरून पोलीसांनी त्यांना पकडले.

दरम्यान, तपास केल्यानंतर तिच्या वडिलांनी खुनाची कबुली दिली. मिनाक्षीला कपड्यांसाठी पैसे देण्यासाठी आणि भेटण्यासाठी बोलवले होते. तेथे तिच्या वडिलांनी काही पैसे खाली पाडले ते उचल्यासाठी मिनाक्षी वाकली तेव्हा त्यांनी तिच्यावर चाकून हल्ला केला आणि तिला मारले.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like