Homeताज्या बातम्यामुंबईतील सर्वात मोठ्या फिनिक्स मॉलला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी...

मुंबईतील सर्वात मोठ्या फिनिक्स मॉलला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : कुर्ला परिसरातील कुर्ला फिनिक्स मॉलला (Kurla Phoenix Mall)
भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पहाटेच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले की, फिनिक्स मॉलमधील (Phoenix Mall) कपड्याच्या दुकानाला पहाटे ५ वाजता आग लागली होती. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी मॉलमधील कपड्याच्या दुकानावर पाण्याचा मारा करुन ही आग तातडीने नियंत्रणात आणली. ही आग इतर दुकानात पसरु नये, म्हणून खबरदारी घेतल्याने आग आटोक्यात राहिली. या आगीत दुकानातील सर्व कपडे जळून खाक झाले.

भिवंडीतही गोदामाला आग
भिवंडी शहरातील झेंडानाका इथील एका भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. गजबजेल्या वस्तीत दोन मजली इमारतीमध्ये असलेल्या भांड्याच्या गोदामाला आग लागल्याचे समजताच या व शेजारील इमारतीतील लोकांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून अग्निशमन दलाने आता आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News