×
Homeक्राईम स्टोरीMumbai Fire News | मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकाबाहेर आग

Mumbai Fire News | मुंबईतील अंधेरी रेल्वेस्थानकाबाहेर आग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Fire News | दररोज वाऱ्याच्या वेगाप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचे आज एका घटनेने चांगलेच लक्ष वेधून घेतले. मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील दुकानांना शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. पहाटे साडेपाचच्या सुमारास स्टेशन बाहेरील दुकानांना ही आग लागली. आग लागल्याचे कळताच तात्काळ अग्निशामक दलालाल पाचारण करण्यात आले आणि सदर आग विझवण्यात आली. वेळ पहाटेची असल्याने रेल्वे स्थानकांत तुरळक गर्दी होती त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झालेली नाही. (Mumbai Fire News)

 

अंधेरी पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेर पहाटे साडेपाचच्या सुमारास रेल्वे स्थानकाबाहेरील तीन-चार दुकानांना आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली असून पहाटेची वेळ आणि तुरळक गर्दी यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. (Mumbai Fire News)

 

अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना सुद्दा बहुमजली इमारतीतून दाट धूर निघताना दिसत होता. दरम्यान, सदर प्रकार सोशल मीडियावर व्हिडीओमध्ये कैद झाल्यामुळे स्थानकांत आग लागल्याचे वृत्त लगेचच पोहोचले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात सुद्धा धुराचे लोट पसरल्याचे दिसून येत होते. एका वृत्तानुसार पहाटेच्या आगीमुळे रेल्वेचे कर्मचारी प्लॅटफॉर्मच्या भागाची दुरुस्ती करत असून स्थानकाभोवती ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे.

या घटनेआधी अशीच एक आगीची घटना मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) मंगळवारी घडल्याचे समोर आली होती.
या उद्यानात बिबट्यांसह वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. रात्री 10 च्या सुमारास ही आग लागलीस त्यावेळी तात्काळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या,
तीन जंबो टँकर आणि इतर मदत गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि सदर आग विझवण्यात आली.

 

तसेच या आठवड्याच्या सुरवातीला उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावरील सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी)
बॅरेकसमोरील प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या.

 

Web Title :- Mumbai Fire News | video fire breaks out outside mumbai s andheri railway station no injuries reported

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर

Must Read
Related News