आरे कॉलनीतील जंगलाला भीषण आग 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन  – गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलाला लागलेल्या भीषण आगीला तब्बल सहा तासांनी आग्निशामक च्या १०० जवानांनी रात्री साडेबारा वाजता नियंत्रणात आणले. आरे कॉलनीतील इन्फिनिटी आय टी पार्कच्या जवळच्या जंगलात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण आग लागली ही आग ३ ते ४ किलोमीटर परिसरात पसरली होती.या आगीची तीव्रता पाहता जंगलात राहणाऱ्या आदिवासी आणि गाई-गुरांना दुसऱ्या ठिकाणी हालवण्याच्या सूचनाही अग्निशामक दलामार्फत देण्यात आल्या.

डोंगराळ  भागात आग लागल्याने अग्नीशामक  दलाच्या गाड्या तिथे पोहचू शकत नव्हत्या त्यामुळे जवानांनी पायी जाऊन आग वीजवली . आरे कॉलनीतल्या डोंगरावरील जंगलाला लागलेली आग ही  इतकी भीषण होती की ती शहराकडे पसरते की काय अशी भीती स्थानिकांना वाटत होती .आग लागल्याची छायाचित्रे स्थानिकांनी समाज माध्यमांवर अपलोड केली.

येथील डोंगर परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हा स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले होते. मात्र या आगी लागत नसून त्या लावल्या जात असल्याचा संशय स्थानिकांना आहे. त्यामुळेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सज्ज राहावे, असेही प्राणिमित्र संघटना आणि पर्यावरणवादी संघटनांचे म्हणणे आहे.