‘ये नही प्यारे कोई मामुली अंडा’, किंमत फक्त १७०० रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि काही ऑर्डर केली. ते खाल्ले आणि त्यानंतर जर जेवणाची अवाजवी किंमत असल्यावर आपण देतोही. पण एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अवाजवी किंमत लावली तर आपण नक्कीच विचार करतो एवढी रक्कम का ? कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये अन्नाच्या काहीही किंमती लावण्यात येतात ते फक्त पैसे कमवण्यासाठी, पण २० रुपयाच्या गोष्टीला जर एखाद्या हॉटेलने हजार दोन हजार घेतले तर आश्चर्य वाटणे सहाजिकच आहे. मुंबईच्या एका हॉटेलमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे.

२ उकडलेल्या अंड्याचा दर थेट १७०० रुपये लावण्यात आला आहे. हा प्रकार मुंबईतील फोर सिझन हॉटेलमधील आहे. या एका बीलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत, असून हे बील ८ ऑगस्टचे आहे. कार्तिक धर या व्यक्तीने हा बिलाचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. तसंच त्याने या हॉटेलच्या अकाऊंटला आणि आपला मित्र राहुल यांना टॅग केले आहे. २ अंड्यांचा दर १७०० रुपये लावल्याने भावा आंदोलन करायचे का?, असा मिश्किल सवालही त्याने केला आहे.

दरम्यान, या बिलात १ ऑमलेट ८५० रुपये लावण्यात आलेत. १ उकडलेले अंडे ८५० रुपयांना आहे. १ कोक तब्बल २५० रुपयांना असे रेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे या हॉटेलमध्ये असे काय आहे की तेथे अंडी एवढी महाग का आहेत, असे सवाल केले जात आहेत. तसंच अनेकांनी यावर कमेंट दिल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like