Mumbai Gangrape | धक्कादायक ! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई शहरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Mumbai Gangrape) केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तीन जणांनी एका 42 वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार (Mumbai Gangrape) केला. हा प्रकार कुर्ला परिसरात बुधवारी पहाटे घडला. पीडित महिला आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपींनी पीडित महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच तिला धारदार शस्त्राचा धाक दाखवत तिच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

 

वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी आणि पीडित महिला एकाच वस्तीत राहतात. आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Mumbai Gangrape) केला आणि अनैसर्गिक अत्याचारही केले. आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट भागावर सिगारेटचे चटके दिले. तसेच तिच्या छातीवर आणि दोन्ही हातांवर धारदार हत्याराने वार केले. एका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला असून, पोलिसांकडे गेली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली.

 

पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रसंग शेजाऱ्यांना सांगितला.
शेजाऱ्यांच्या माध्यमातून पीडिता एका एनजीओच्या संपर्कात आली.
त्यानंतर पीडितेने एनजीओच्या मदतीने कुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध आयपीसी 376 (बलात्कार), 376डी (सामूहिक बलात्कार),
377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 324 (शस्त्राने दुखापत करणे) आणि इतर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Mumbai Gangrape | horror 42 year old woman gangrape in mumbai cigarette burns on victims private parts mumbai crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार