ONGC नं गॅस ‘लिक’चं वृत्‍त नाकारलं, पावसामुळं ‘दुर्गंधी’ असल्याचं सांगितलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबईतील उरणमधील ओएनजीसी प्लांटमध्ये बुधवारी सकाळी गॅस गळतीची बातमी समजल्यानंतर घबराट पसरली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आणि घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात  आले. मात्र  नंतर कंपनीने गॅस गळतीची बातमी फेटाळून लावली आणि म्हटले की पावसामुळे वायूचा वास पसरला, जो सामान्य आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गॅस इतक्या वेगाने गळत होता की त्याच्या वासामुळे लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या  घटनास्थळावर पोहोचल्या तसेच प्लांटच्या आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला आहे.

ओएनजीसी  कंपनीने आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले आहे की, सर्वत्र खबरदारी घेतली गेली आहे आणि हा प्रकल्प सामान्यपणे चालू आहे. काळजी करण्याचे  काहीच कारण नाही. ओएनजीसीने नंतर स्पष्ट केले की तेथे गळती नव्हती आणि हा केवळ हायड्रोकार्बन्सचा वास होता, जो सतत पडणाऱ्या  पावसामुळे पसरला होता.

3 सप्टेंबर रोजी ओएनजीसीच्या उरण प्लांटमध्ये झालेल्या भीषण आगीत 5 लोकांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन इंजिनांना आग विझविण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता . आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तीन तासांहून अधिक वेळ लागला होता .

Visit : policenama.com