17 वर्षीय मुलगी होती प्रियकराबरोबर बेडरूममध्ये, आई येताच झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अचानक आई बेडरूम मध्ये आल्यामुळे प्रियकरासोबत असलेल्या १७ वर्षीय तरुणीने पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारल्याचा प्रकार घडला आहे. त्यात मात्र तिच्या पायाला दुखापत झाली आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला भागात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन तरुणी आपल्या प्रियकरासोबत बेडरुममध्ये होती. आई घरी आल्याचे लक्षात येता, तरुणीने प्रियकराला खिडकीतून पळून जाण्यास सांगितले. परत तिनेही खिडकीतून उडी मारली. पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली. नंतर तिने आपण घाबरल्याने हे पाऊल उचल्याचे कुटूंबियांसमोर कबूल केले.

सुनील झेंडे असे या प्रियकराचे नाव असून तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुनील झेंडे याच्याविरूध्द पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.