अल्पवयीन विद्यार्थीनीनं दाखल केली FIR तर शिक्षकानं फेकलं ‘अ‍ॅसिड’, सर्वत्र खळबळ

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – एका 15 वर्षीय विद्यार्थीनीने चुकीची शिक्षा दिली म्हणून एका शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर शिक्षकाने माणुसकीला काळिमा फासत विद्यार्थीनीवर ऍसिड फेकले आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

22 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे यावेळी विद्यार्थिनी मॉर्निंग वॉक साठी गेली होती.

काय केले होते विद्यार्थिनीने
2018 मध्ये विद्यर्थिनी इयत्ता 9 मध्ये शिकत होती. एके दिवशी विद्यर्थीनीला शिक्षकांनी शिक्षा दिली होती. त्यानंतर विद्यार्थिनीने भांडुप पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक स्टाफच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी होती.

विद्यार्थीनिवर फेकले ऍसिड
विद्यार्थिनी सकाळी मॉर्निंग वॉकला गेली असता काही शिक्षक तिच्या मागे लागले. हुसैनारा (महिला), जावेद, अमन आणि हासिम यांनी पीडितेला अडवले आणि तिच्या शरीरावर ऍसिड फेकले. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले.

पीडितेला आरोपींनी धमकी दिली की, जर तिने याबाबत घरच्यांना सांगितले तर ते घरच्यांची देखील हीच हालत करतील. ऍसिड फेकल्यानंतर आरोपी कारणे फरार झाले.

आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल
ऍसिडने जखमी झालेल्या विद्यार्थिनीला घाटकोपरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर सायन रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर अखेर विद्यार्थिनीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. विक्रोळी येथील पोलीस स्टेशनमध्ये चारही आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वकील मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/