पगार फक्त 25000, अपघातानंतर कुटूंबियांचा 1 लाखाचा ‘क्लेम’, मिळाले मात्र 1 कोटी 35 लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 7 वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघाताची भरपाई म्हणून एका कार मालकाला तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे त्या कार मालकाने अपघात होण्यापूर्वी काही दिवस ती कार विकली होती. मात्र कारचे कागदपत्रे ट्रान्सफर केले नव्हते.

काय आहे प्रकरण-

31 मार्च 2012 रोजी रात्री उशिरा वांद्रे येथील एका क्लबमध्ये पार्टी केल्यानंतर प्रियंका राय आपल्या 4 मित्रांसह परत येत होती. त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तिच्या मैत्रिणी शिवानी आणि निमिषा यांचा मृत्यू झाला तर प्रियंका ला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, गाडी चालवत असलेल्या राहुल मिश्रा नावाच्या युवकाला किरकोळ दुखापत झाली. दारूच्या नशेत वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातात प्रियंका राय हिला गंभीर दुखापत झाली. प्रियांकाला प्रथम कुपर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यानंतर तिला क्रिटी केअर रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अहवालात असे सांगितले गेले होते की प्रियांकाच्या डोक्याला अनेक जखमा झाल्या आहेत तसेच तिच्या मांडीचे हाडही तुटले आहे. आता या घटनेला 7 वर्षे उलटून गेली आहेत पण प्रियांकाची अवस्था तशीच आहे. सध्या तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या शरीराला पूर्णपणे अर्धांगवायू झाला आहे.

या अपघातानंतर प्रियंकाच्या वडिलांनी न्यायाधिकरणात (ट्राइब्यून) 1 लाख रुपयांचा दावा केला. परंतु न्यायाधिकरणाने 1 लाख ऐवजी 1 कोटी 35 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. हे पैसे त्या कारचे मालक उदय शाह यांना द्यावे लागतील ज्या कारमध्ये प्रियंका होती. उदय शाह यांनी अपघाताच्या आधी ती कार विकली होती, मात्र पेपर ट्रान्सफर केले नव्हते.

म्हणून एवढी भरपाई द्यावी लागणार –

प्रियंकाचे सध्याचे वय 30 वर्षे आहे. न्यायाधिकरणाने सांगितले की त्याला 8 टक्के वार्षिक व्याजासह 86 लाख 39 हजार रुपये द्यावे लागतील. कारण ती अपघाताच्या वेळी काम करायची आणि तिचा पगार महिन्याला 25 हजार रुपये होता. त्यानुसार प्रियांकाला कायद्यानुसार 54 लाख रुपये दिले जातील. त्याशिवाय रुग्णालयांच्या उपचारांमध्ये खर्च केलेल्या पैशाच्या प्रतिपूर्तीनुसार 15 लाख 12 हजार रुपयेही देण्यात येणार आहेत. प्रियंकाला उपचारादरम्यान बर्‍याच मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले. त्याऐवजी तीन लाख रुपये आणि जास्तीचे पैसे दिले जातील. त्यानुसार भरपाईची एकूण रक्कम 1 कोटी 35 लाख रुपये झाली.

प्रियंका राय यांच्या नावावर 5 वर्षांची एफडी बनवून 50 लाख रुपये रक्कम हस्तांतरित करावी, असे निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत. याशिवाय उर्वरित रक्कम शक्य तितक्या लवकर त्याच्या कुटुंबाकडे धनादेशामार्फत द्यावी आणि हे सर्व पैसे कारचे मालक उदय शाह यांना द्यावे लागतील.

या प्रकरणातून काय धडा घ्याल

१) मद्यपान करणे किती धोकादायक आहे. त्या युवकाने मद्यपान केले नसते तर कदाचित त्याचा अपघात झालाच नसता आणि कदाचित दोन जीव वाचले असते आणि प्रियंकाच्या आयुष्याच एवढं नुकसान झालं नसतं. म्हणूनच मद्यपान करण्यापूर्वी आणि वाहन चालवण्यापूर्वी एक हजार वेळा विचार केला पाहिजे.

२) प्रियंका ज्या कारमधून चालली होती त्या कारचा मालक उदय शाह होता. उदय शाहने अपघात होण्याच्या काही दिवस अगोदर परमजीत बोहट नावाच्या व्यक्तीला आपली कार विकली. परंतु त्यांनी कारचे कागदपत्र ट्रान्सफर न करण्याची चूक केली. या घटनेवर सुनावणीत न्यायाधिकरणाने उदय शहा यांची बाजू ऐकण्यास नकार दिला. त्यानंतर उदयला दंडाची संपूर्ण रक्कम द्यावी लागेल. उदय शाह यांनी त्यांच्या वतीने कागदपत्र पूर्ण केले असते तर कदाचित त्यांना दंड भरावा लागला नसता किंवा ते या प्रकरणात अडकले नसते.

Visit : Policenama.com