Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway Accident) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 9 जण जागीच ठार झाले आहेत तर एक 4 वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली आहे. या मुलीवर माणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई, गोवा हायवेवर (Mumbai Goa Highway Accident) गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

 

काय घडले नेमके?

हाती आलेल्या माहितीनुसार, ट्रक आणि इको कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, 9 जण जागीच ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये 4 महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात 4 वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली आहे. तिच्यावर माणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

पहाटे पाचच्या सुमारास ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.
तो ट्रक विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला आणि हा भीषण अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या भीषण अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

Web Title :- terrible accident on mumbai goa highway 9 people died in the accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा