दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन 

महाड जवळील केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. केंबुर्ली ते वहुर-दासगावदरम्यान खाडीलगत दरड कोसळल्याने संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दोन जेसीपी व एका क्रेनच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेच प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना दिली आहे.

कोसळलेल्या दरडीत दगडांपेक्षा लाल मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, चिखलावरुन वाहने घसरण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी कोणत्याही प्रकारे घाई करु नये. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वराडे यांनी केले आहे. दरम्यान, मुंबईकडून गोव्याकडे जाण्याकरता छोट्या वाहनांसाठी ‘माणगांव-निजामपुर-पाचाड-महाड’ हा पर्यायी मार्गदेखील उपलब्ध आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी डोंगर खोदण्यात येत आहेत़ डोंगर खोदण्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याने पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका  असल्याचे शक्यता वर्तवली जात होती.दरम्यान, टोल पुलाजवळ व महाड शहराजवळ वाहतूक थांबविण्यात आली आहे.

जाहिरात