चिखलफेक प्रकरणी कोल्हापूरातील नागरिक संतप्त ; नितेश राणेंचा पुतळा जाळला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – काल गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखलफेक केली होती. त्यानंतर नितेश राणे यांची रवानगी पोलीस कोठडीत केली. त्याचे पडसाद आता कोल्हापूरात दिसून येत आहेत. कोल्हापूरातील करंबळी गावात नितेश राणेंचा पुतळा जाळण्यात आला आहे. नितेश राणेंचा पुतळा जाळणारे नागरिक हे शेडेकर यांचे गाववाले आहेत.

ज्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली ते प्रकाश शेडेकर हे कोल्हापुरातील करंबळी गावचे रहिवासी आहेत. शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याने करंबळी गावातील नागरिक नितेश राणेंवर संतप्त झाले होते. त्यांनी या घटनेचा निषेध नितेश राणेंचा पुतळा जाळून केला. पुतळा जाळताना गावकऱ्यांनी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

सध्या गोवा हायवेचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, तसंच अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुरूवार ४ जुलै रोजी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेत सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असे सवाल केले. यावेळी नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलफेक करत त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास ५० समर्थकांवर कलम ३५३, ३४२, ३३२, ३२४, ३२३, १२०(अ), १४७, १४३, ५०४, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

‘हा’ त्रास असल्यास होऊ शकतो ‘हर्निया’

‘युरिक अ‍ॅसिड’ची समस्या ‘या’ घरगुती उपायांनी दूर करा

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

 

You might also like