मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट ट्रेन आठवड्यातून चार दिवस धावणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे बंद केलेली रेल्वे सेवा आता गेल्या काही महिन्यांपासून पूर्ववत करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने आता मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून चार दिवस ही सेवा दिली जाणार असून 19 जानेवारीपासून सेवेला प्रारंभ होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटते. ही सेवा पुर्ववत झाल्यामुळे मुंबई दिल्ली प्रवास करणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन मुंबईहून सांयकाळी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 9 वाजून 55 मिनिंटानी पोहोचेल. या ट्रेनचा क्रमांक 01221 आणि 012222 हा असेल. 19 जानेवारीपासून मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन सेवा सुरु होणार आहे. ट्रेन नंबर 01222 ही हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 20 जानेवारीला हजरत निजामुद्दीन येथून सुटणार आहे. हजरत निजामुद्दीन येथून ही ट्रेन सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजून 15 मिनिंटानी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

प्रवाशांना मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनसाठी 14 जानेवारीपासून बुकिंग करता येणार आहे. तसेच या ट्रेनच्या थांब्यांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. या ट्रेनच्या तिकीटाचे बुकिंग रेल्वे स्टेशन आणि आयआरसीटीसी वेबसाईट आणि अ‌ॅपद्वारे करता येणार आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झालेले असेल त्यांनाच या गाडीतून प्रवास करता येईल.