Mumbai Heat Wave | मुंबई, पुण्यासह कोकणात पुढच्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन : Mumbai Heat Wave | राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. लोकांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दिवसा उन्हाच्या झळा तर रात्री थंडी अशी अवस्था राज्यातील काही जिल्ह्यांची झाली आहे. मागच्या दोन दिवसांपासून कोकण आणि पुणे परिसरात पारा 35 अंशांवर जाऊन पोहोचल्याचा अंदाज आहे. मागच्या 24 तासांत सोलापूर जिल्ह्यात 37 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अंशांची नोंद झाली आहे. तर पुणे आणि मुंबई या दोन मुख्य शहरांचाही पारा 35 पर्यंत गेला आहे. या सगळ्याचा परिणाम नागरिकांच्या थेट आरोग्यावर होत आहे. (Mumbai Heat Wave)

राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोग पसरल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडला आहे. (Mumbai Heat Wave)

राज्याच्या उत्तरेत किमान तापमानात घट कायम आहे. धुळ्यासह निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 8.2 अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे किमान तापमान 10
अंशांच्या जवळपास गेले आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

कोणत्या जिह्ल्यात किती तापमान ?

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 34.1 (10.6), जळगाव 33 (10.1), धुळे 32 (8), कोल्हापूर 35 (19),
महाबळेश्वर 31.6 (13.4), नाशिक 31.2 (10.9), सांगली 36.1 (17.3), सातारा 35.2 (16.4),
सोलापूर 37.2 (16.5), रत्नागिरी 36.4 (21.2), औरंगाबाद 32.2 (10.2), नांदेड (16.2),
परभणी 34.4 (13.4), अकोला 35 .2 (12.5), 4.8), ब्रम्हपूरी 33.7 (14.6), चंद्रपूर 31 (11),
नागपूर 31.8 (11.7) तापमानाची नोंद झाली.

उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन

summer उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहतं.
उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा.
कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात.

Web Title :- Mumbai Heat Wave | heat wave in mumbai pune konkan likely to intensify in next few days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना