Mumbai High Court | अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांचा मुंबई हायकोर्टात युक्तीवाद, जन्मठेप झालेल्या तिघांची निर्दोष मुक्तता

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik News | अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम (Adv. Aniket Ujjwal Nikam) यांनी न्यायालयात केलेल्या युक्तीवादामुळे जन्मठेप (Life imprisonment) झालेल्या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions) खुनाच्या गुन्ह्यामध्ये तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या विरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) तिघांची निर्दोष मुक्तता केली.

काय आहे प्रकरण ?
28 मार्च 2017 रोजी कृष्णा नागे (रा. नाशिक रोड) यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात पवन बोरसे, अंकुश नाठे व इतर 1 यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. एप्रिल 2018 मध्ये नाशिक सत्र न्यायालयाने तिन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) अपील केले होते. अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम (Adv. Aniket Ujjwal Nikam) यांनी अंकुश नाठे व पवन बोरसे यांची बाजू उच्च न्यायालयात मांडली व युक्तीवाद केला.

अ‍ॅड. अनिकेत निकम यांचा युक्तीवाद
आरोपींच्या विरोधात असलेला पुरावा हा परिस्थितीजन्य पुरावा आहे व तपास यंत्रणेने गोळा गेलेल्या पुराव्यांची साखळी ही सकृतदर्शनी सदरच्या आरोपीने गुन्हा केला आहे हे सिद्ध करत नाही. तसेच कृष्णा नागे यांचा मृत्यू दुर्दैवी होता परंतु आरोपी व कृष्णा नागे यांच्यामध्ये कोणतेही वैमनस्य व त्याला मारण्याचा कोणताही हेतू आरोपीकडे नव्हता, असा युक्तीवाद अ‍ॅड. निकम यांनी केला.

 

सरकारी वकिलांचा युक्तीवाद

सरकारी वकील शिंदे यांनी कोर्टापुढे युक्तीवाद केला की, आरोपींना ठोठावलेली शिक्षा ही रास्त आहे. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा असल्यामुळेच सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यावर अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी युक्तीवाद केला की, संपूर्ण प्रकरणामध्ये कोणताच प्रथमदर्शनी साक्षीदार नाही आणि केस ही परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. तसेच परिस्थितीजन्य पुराव्याला सत्र न्यायालयाने अयोग्य वजन दिले. हे विविध सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने न्यायनिवाडे सादर करुन कोर्टापुढे आपले म्हणणे मांडले. तसेच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी ही सिद्ध होत नाही. तसेच अशा परिस्थितीत आरोपी नाठे व बोरसे यांनी कट कारस्थान करुन खून केल्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवता येत नाही.

कोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता
न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला. 16 जुलै 2021 रोजी निकाल देताना निरीक्षण नोंदवले की, आरोपीच्या विरुद्ध सादर केलेल्या पुराव्यांची साखळी ही सिद्ध होत नाही. अशा परिस्थितीत आरोपींनी कट-कारस्थान करुन खून केल्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवता येत नाही. उच्च न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपी पवन बोरसे आणि अंकुश नाठे हे मार्च 2017 पासून नाशिक कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ते लवकरच बाहेर येतील.

Web Title :- Mumbai High Court | Adv. Aniket Ujjwal Nikam’s argument in mumbai high court, acquittal of three convicts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल