Mumbai High Court | कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात सोनू सूद आणि सिद्दीकी यांच्या भूमिकेची चौकशी करा – मुंबई हायकोर्टचा आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई हायकोर्टने (Mumbai High Court) बुधवारी महाराष्ट्र सरकारला आदेश दिला आहे की, नागरिकांसाठी कोरोनावरील औषधांची खरेदी आणि पुरवठ्यात काँग्रेस आमदार जीशान सिद्दीकी (Congress MLA Zeeshan Siddiqui) आणि अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, हायकोर्टाने (Mumbai High Court) म्हटले की, या लोकांनी स्वताला एकप्रकारचा देवदूत बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या गोष्टीची सुद्धा पडताळणी केली नाही की जी औषधे त्यांनी खरेदी केली आहेत, ती बनावट तर नाहीत आणि पुरवठा वैध आहे किंवा नाही.

न्यायमूर्ती एसपी देशमुख (Justice SP Deshmukh) आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी (Justice GS Kulkarni) यांच्या पीठाला महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले होते की, महाराष्ट्र सरकारने चॅरिटेबल ट्रस्ट बीडीआर फाऊंडेशन आणि त्यांच्या ट्रस्टींविरूद्ध सिद्दीकी यांना रेमडेसिविर (Remedesivir) औषधाचा पुरवठा करण्याच्या प्रकरणात माझगाव मेट्रोपॉलिटीन कोर्टात गुन्हेगारी प्रकरण दाखल केले होते. यानंतर पीठाने महाराष्ट्र सरकारला चौकशीचे निर्देश दिले.

कुंभकोणी यांनी म्हटले की, सिद्दीकी हे केवळ त्या नागरिकांना औषधे पोहचवत होते.
जे त्यांच्याशी संपर्क करत होते. यासाठी त्यांच्याविरूद्ध अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यांनी म्हटले की, सोनू सूद यांनी गोरेगावमधील लाईफलाईन केयर हॉस्पिटल येथील औषधाच्या अनेक दुकानांमधून औषधे मिळवली होती.

त्यांनी म्हटले की, फार्मा कंपनी सिप्लाने या फार्मसिंना रेमडेसिविरचा पुरवठा केला होता आणि या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे.
ते हायकोर्टाच्या मागील आदेशावर उत्तर देत होते.
जे कोरोना (corona) महामारीला तोंड देण्यासाठी आवश्यक औषधे आणि साधनांच्या व्यवस्थापनासंबंधी अनेक मुद्द्यांवर दाखल जनहित याचिकांवर सुनावणी करताना सुनावण्यात आले होते.

Wab Title :- Mumbai High Court | bombay high court order role of actor sonu sood and congress mla zeeshan siddiqui should be investigated in the case of buying corona medicine

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये