Mumbai High Court | ‘ग्रामपंचायतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हातकणंगले (Hatkanangale) तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने (Mangaon Gram Panchayat) महावितरण (MSEDCL) कडून वसुली करणेबाबत एक याचिका मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) दाखल केली होती. त्यावर निकाल देताना हाय कोर्टाने ग्रामपंचायतीसाठी महत्वपूर्ण आदेश दिला आहे. माणगाव ग्रामपंचायतीने महावितरण कडून कलम 129 नुसार कर वसुली करावी, तसा कर वसूल करणेचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे आणि तसा महावितरणकडून कर वसूल करणेस आम्ही ग्रामपंचायतीस परवानगी देत आहोत, याबाबत निर्वाळा मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) दिला आहे.

न्यायमुर्ती एफ जे काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने आज (गुरुवारी) निकाल दिला आहे. न्यायालयाकडून अंतिम आदेश जारी झाल्यांनतर आता ग्रामपंचायतीस महावितरणकडून (MSEDCL) कर वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या महावितरणच्या पोल, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्र, हायटेंशन पोल याचा थकित कर वसुलीचे आधिकार ग्रामपंचायतीला अधिनियमातील तरतुदी नुसार आहे, तो माणगाव ग्रामपंचायतीने (Mangaon Gram Panchayat) अधिकाराचा वापर करून कर वसुली करावी असं न्यायालयानं (Mumbai High Court) सांगितलं आहे. माणगाव ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

पुढं हाय कोर्टानं म्हटलं आहे की, महावितरण (MSEDCL) ज्या पद्धतीने आपल्या आधिकाराचा वापर करून आपली थकबाकी वसूल करणेसाठी वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करते.
मग माणगाव ग्रामपंचायतीला ही आपला थकित कर वसूल करणेचा आधिकार आहे.
माणगाव ग्रामपंचायतीने (Mangaon Gram Panchayat) त्या आधिकाराचा वापर करावा आणि वसुलीची कारवाई करावी.
या दरम्यान, 20 डिसेंबर 2018 चा शासन निर्णय काय आहे,
यापेक्षा कर वसुलीचा आधिकार ग्रामपंचायतीला आहे.
त्या अधिकाराचा वापर ग्रामपंचायतीने करावा याबाबत ग्रामपंचायतीने महावितरणावर वसुलीची कारवाई करीत असेलच पत्र आज कोर्टात (Mumbai High Court) हजर केले.

दरम्यान, काल याअंतिम सुनावणीला माणगाव ग्रामपंचायतीच्या (Mangaon Gram Panchayat)
वतीने ॲड. धर्यशिल सुतार, ॲड. संदीप कोरेगावें, सरपंच डॉ. राजू मगदूम, ग्रामविकास अधिकारी बी बी राठोड आणि महावितरण चे अधिकारी, वकील उपस्थित होते.
तर, माणगांव ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. राजू मगदूम (Sarpanch Dr. Raju Magdoom)
म्हणाले की, ‘संपूर्ण माणगांव ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय असून ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी सदैव लढत राहू.

Web Title :- Mumbai High Court | high court collection from msedcl tax collection order for gram panchayat mangaon kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण

Corn Benefits | वजन कमी करण्यापासून डायबिटीजपर्यंत, जाणून घ्या मक्याचे कणीस खाण्याचे 8 जबरदस्त फायदे

Chehre | अमिताभ बच्चन यांनी सांगितली नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, आता ‘या’ तारखेला चित्रपटगृहांमध्ये उडणार धमाल (व्हिडिओ)