Mumbai High Court | ‘जोड्या स्वर्गात नव्हे, नरकात बनतात’, पतीला अटकेपूर्वी जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court | ’जोड्या स्वर्गात (Heaven) नव्हे, नरकात (Hell) बनतात’, एका घरगुती वादाच्या (Domestic Violence Case) सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ही टिप्पणी केली. उच्च न्यायालयाचे न्या. सांरग कोतवाल (Justice Sarang Kotwal) यांचे ‘पीठ’ एका पतीकडून दाखल याचिकेवर सुनावणी करत होते, ज्यामध्ये त्याच्या पत्नीने क्रौर्य आणि हुंड्याच्या (Cruelty And Dowry) मागणीचा आरोप केला होता आणि हे विवाहित जोडपे सोबत राहण्यास तयार नव्हते.

 

न्यायालयाने पाहिले की, पती आणि पत्नीने एकमेकांविरूद्ध गुन्हे दाखल केले होते. न्या. एस. व्ही कोतवाल यांनी आदेशात म्हटले की, एफआयआरवरून समजते की, पती (Husband) आणि पत्नी (Wife) एकमेकांसोबत राहू शकत नाहीत. त्यांच्यात सतत भांडणे होत होती. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्या. कोतवाल यांनी संतापून अशीही टिप्पणी केली होती की, जोड्या स्वर्गात नव्हे, नरकात बनतात.‘

 

प्रकरण असे आहे की, एका महिलेने डिसेंबर 2021 मध्ये आपल्या पतीविरूद्ध एक एफआयआर दाखल केली होती, ज्यामध्ये तिने आरोप केला होता की, 2017 मध्ये त्यांच्या विवाहादरम्यान (Marriage) पतीच्या कुटुंबाला प्रत्येक सदस्यासाठी सोन्याचे नाणे पाहिजे होते. महिलेचे कुटुंब ही मागणी पूर्ण करू न शकल्याने सासरचे लोक तिला त्रास देऊ लागले होते. (Mumbai High Court)

पत्नीने दावा केला की, तिने फ्लॅट खरेदी करण्यासाठी 13 लाख 50 हजार रुपये दिले, ज्यामध्ये हे दाम्पत्य आपल्या 3 वर्षाच्या मुलासोबत राहत होते.
तिने असाही आरोप केला की पतीने स्वतावरच काही जखमा करून घेतल्या,
जेणेकरून असे दाखवता येईल की पत्नीने त्याला मारहाण केली होती.

 

दुसरीकडे पतीचा आरोप होता की, त्याने फ्लॅटसाठी 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते
आणि लग्नानंतर पत्नीला मॉरिशसला घेऊन गेला होता आणि तिला एक महागडा मोबाइल सुद्धा भेट दिला होता.

 

त्याने काही व्हॉट्सअप चॅटद्वारे (WhatsApp Chat) न्यायालयाला सांगितले की, कशाप्रकार त्याला पत्नीकडून सातत्याने त्रास दिला होता.
पतीने आरोप केला की, पत्नीच्या विरूद्ध त्याने एक तक्रार दाखल केली होती,
आणि उत्तरादाखल पत्नीने सुद्धा पतीवर केस दाखल केली.

 

न्या. कोतवाल यांनी म्हटले, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय निर्णयावर पोहचले आहे की,
पतीच्या अटकेने हा मुद्दा सुटणार नाही.
चौकशीच्या उद्देशाने सुद्धा पतीची कोठडीत चौकशी करण्याची गरज नाही.
त्याला तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास सांगितले जाऊ शकते.

 

आरोप आणि प्रत्यारोप आहेत, ज्याच्या निर्णय केवळ सुनावणीच्या दरम्यान केला जाऊ शकतो.
त्यांनी पोलिसांना निर्देश दिले की, अटकेच्या स्थितीत पतीला एक किंवा जास्त जामीनदारांसह 30 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनावर सोडण्यात यावे.

 

Web Title :- Mumbai High Court | marriage not made in heaven but hell justice sarang kotwal of bombay high court while granting pre arrest bail to a husband

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा