क्राईम स्टोरीपुणे

Mumbai High Court | हाय कोर्टाचा निर्वाळा ! आत्महत्येनंतर तब्बल 29 वर्षांनी मिळाला माय-लेकीला न्याय; पतीला ठोठावली शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court | एका प्रकरणामध्ये मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) महत्वपुर्ण निकाल दिला आहे. 29 वर्षांपूर्वी पतीच्या त्रासाला त्रस्त होऊन पुण्यातील (Pune News) एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली आहे. हाय कोर्टाने पतीला 3 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 29 वर्षांपूर्वी पुण्यातील मायलेकीला न्याय मिळाला आहे. रामदास ढोंडू कलाटकर (Ramdas Dhondu Kalatkar) असं शिक्षा झालेल्या दोषी पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहितीनूसार, जनाबाईस कलाटकर (Dead Janabais Kalatkar) असं आत्महत्या (Suicide) करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पती रामदास कलाटकर याला जनाबाई यांच्यापासून 2 मुली झाल्या होत्या. परंतु, मोठ्या मुलीचे आकस्मिक निधन (Died) झाले होते. यानंतर दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर जनाबाई काही दिवसांसाठी आपल्या माहेरी गेल्या होत्या. काही महिन्यांनी त्या जेव्हा परत आल्या, तेव्हा पती रामदास हा भारती नावाच्या अन्य महिलेसोबत राहत असल्याचे समजले. यानंतर जनाबाई याही रामदास यांच्यासोबत राहू लागल्या. परंतु, काही दिवसांंमध्ये पती, सासू-सासरे आणि भारती (Bharati) नावाची महिला पीडित जनाबाई यांना त्रास करु लागले होते. तसेच मारहाण, अपमानास्पद वागणूक देत होते. याबाबत जनाबाई यांनी आपल्या घरच्यांना सांगितलं होतं. नंतर त्यांच्या घरच्यांनी पती आणि सासु सास-याला समजावलं होतं. पण, हे कृत्य असंच सुरु राहिलं.

दरम्यान, अखेर 9 ऑक्टोबर 1992 रोजी जनाबाई यांनी आपल्या अल्पवयीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या घटनेनंतर मृत जनाबाई यांचा भाऊ भानुदास दरेकर (Bhanudas Darekar) यांनी आरोपी पती रामदास कलाटकर याच्यासह त्याची आई नखुबाई (Nakhubai) आणि भारती (Bharati) यांच्याविरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला. यानंतर पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालायाने (Pune District Sessions Court) तिन्ही आरोपींना दोषी ठरवलं. याप्रकरणी न्यायालयाने पतीला 3 वर्षांचा सश्रम कारावास सुनावला तर भारती नावाच्या महिलेला 6 महिन्यांचा साधा कारावास सुनावला. या सुनावणी दरम्यान सासू नखुबाई यांचं निधन झालं होतं.

यानंतर काही वर्षांपूर्वी भारती नावाच्या महिलेचे देखील निधन झालं. दरम्यान, दोन्ही आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निकालाला मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) आव्हान दिलं होतं. यावर सुनावणी केल्यानंतर घटनेच्या 29 वर्षांनी न्यायालयाने निर्वाळा केला आहे. न्यायालयाने दोषी पतीची तुरुंगात रवानगी केली आहे.

Web Title : Mumbai High Court | mother and daughter jump into well and commits suicide after
29 years mumbai high court sentenced accused rigorous imprisonment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Back to top button