Mumbai High Court On Sameer Wankhede | वानखेडेंची याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने हायकोर्ट संतप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court On Sameer Wankhede | एनसीबीचे (NCB) तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मद्यालयाचा परवाना सरकारने रद्द केला (Bar License Cancelled) आहे. तो पूर्ववत करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सोमवारी याचिका दाखल केली. त्यानंतर ही याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने उच्च न्यायालय संतप्त झाले. वानखेडे यांची याचिका तातडीने सुनावणीस आलीच कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Mumbai High Court On Sameer Wankhede)

 

न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर तीन दिवसानंतर त्यावर सुनावणी घेतली जाते असा नियम आहे. मात्र, वानखेडेंची याचिका इतक्या तातडीने आमच्यासमोर सुनावणीला आलीच कशी, असा संतप्त सवाल न्या. गौतम पटेल (Justice Gautam Patel) व न्या. माधव जामदार (Justice Madhav Jamdar) यांच्या खंडपीठाने न्यायालयाचे कर्मचारी व वानखेडे यांच्या वकिलांना केला. नियमानुसार सामान्यांना सुनावणी मिळणार पण समाजातील कोणी प्रभावी व्यक्ती असेल, तर तातडीने सुनावणी मिळणार का ? न्यायव्यवस्था यासाठीच आहे का ?’ असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला. (Mumbai High Court On Sameer Wankhede)

 

समीर वानखेडे यांच्या मद्यालयाचा परवाना ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला. वानखेडे यांच्या नावाने ते सज्ञान नसताना म्हणजेच, अवघ्या सतराव्या वर्षी मद्यालय परवाना काढला होता. चौकशीत ही बाब समोर आली त्यावेळी हा परवाना रद्द करण्यात आला. त्या कारवाईला समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सोमवारी याचिका दाखल केली अन मंगळवारी तात्काळ ही याचिका सुनावणीस आली. त्यामुळे खंडपीठ संतप्त झाले. मद्य परवान्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची गरज काय ? आज सुनावणी घेतली नाही, तर आकाश कोसळणार आहे का ? असा सवाल उपस्थित करत वानखेडेंच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला. दरम्यान, या याचिकेवर पुढील आठ्वड्यात सुनावणी होणार आहे.

 

वानखेडे यांना अटकेपासून अंतरिम दिलासा (Interim Relief To Sameer Wankhede From Arrest)

रेस्टॉरंट व बारमध्ये मद्यविक्रीचा परवाना मिळविण्यासाठी १९९७ मध्ये बनावट कागदपत्रे व चुकीचे निवेदन केल्याबद्दल ठाणे पोलिसांनी (Thane Police) एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणी २८ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी वानखेडे यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार त्यांनी ठाणे पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे न्या. एस. एस. शिंदे (Justice S.S. Shinde) व न्या. एन. आर. बोरकर (Justice N.R. Borkar) यांच्या खंडपीठाने निर्देश दिले.

 

Web Title :- Mumbai High Court On Sameer Wankhede | how did NCB Ex Officer sameer wankhedes petition come up so quickly outrage of the high court hearing on next week

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा