विधानसभा 2019 : भाजपच्या विद्या ठाकुरांना हाय कोर्टाचा दणका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेत्या विद्या ठाकूर यांच्या व्हिनस स्पोर्ट्स अकादमीला क्रिकेट कोचिंगच्या नावाखाली बळकावण्यात आलेलं गोरेगावातील सार्वजनिक मैदान ताबडतोब खुलं करण्याचे आदेश दिले आहेत. प्रेमनगरमधील रस्तुमजी टॉवर्स शेजारी हे मैदान आहे. परंतु न्यायालयाने दिलेल्या या दणक्यानंतर आता हे मैदान व्हिनस क्रिकेट ग्राऊंड न राहता सर्व गोरेगावकरांसाठी खुलं होणार आहे. सर्व गोरेगावकरांच्या वतीने सचिन चव्हाण यांनी व्हिनस विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

व्हिनस स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीतर्फे या मैदानावर आठवड्यातून दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी भरमसाठ फी घेत या मैदानावर क्रिकेट कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली. स्थानिक रहिवासी, लहान मुलांना कोचिंगच्या वेळेत तिथे खेळण्यास बंदी केली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे व्हिनस कल्चर असोसिएशनला हे खुलं मैदान दत्तक देण्यात आलं होतं. या करारानुसार, हे मनोरंजनासाठी वापरणं अपेक्षित होतं. परंतु व्हिनस स्पोर्ट्स क्रिकेट अकदामीतर्फे हे मैदान बळकावण्यात आलं.

न्यायालयाने या विरोधातील जनहित याचिकेवर निकाल देताना कोणत्याही स्पोर्ट्स अकादमीला हे मैदान विशिष्ठ वेळेसाठी विशिष्ठ अ‍ॅक्टीव्हीटीसाठी राखून ठेवता येणार नसल्याचे ठणकावून सांगितले. याशिवाय हे मैदान सार्वजनिक उद्यान म्हणून वापरलं जावं असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like