Mumbai High Court Recruitment 2021 : मुंबई हायकोर्टाने स्टेनोग्राफरच्या पदांवर काढली व्हॅकन्सी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई हायकोर्टाने स्टेनोग्राफर, हायर ग्रेड आणि लोअर ग्रेडच्या पदांसाठी भरती काढली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत पोर्टल bombayhighcourt वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन लक्षपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा, कारण जर फॉर्ममध्ये कोणतीही गडबड आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.

कोर्टाकडून जारी नोटिफिकेशननुसार, या पदांवर अर्ज प्रक्रिया आज म्हणजे 18 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली आहे. तसेच या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणार्‍या उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. याशिवाय या पदांसाठी वयोमर्यादा सुद्धा नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा
https://bombayhighcourt.nic.in/

अशी होईल निवड
स्टेनोग्राफरच्या पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज करणार्‍या उमेदवारांची निवड शार्टहँड, टायपिंग आणि वॉयवाच्या आधारावर केली जाईल. शिवाय निवड प्रकियेशी संबंधीत अधिक माहिती अधिकृत पोर्टलवर व्हिजिट करून मिळू शकते.

असे असेल वेतन
स्टेनोग्रॉफर हायर ग्रेड पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 41800 ते 132300 रुपये सॅलरी दिली जाईल. याशिवाय स्टेनोग्राफर लोअर ग्रेडच्या पदावर सिलेक्ट होणार्‍या उमेदवाराला 38600 ते 122800 सॅलरी दिली जाईल.

याशिवाय नुकतेच मध्यप्रदेश हायकोर्टाने लॉ क्लर्क कम रिसर्च असिस्टंटच्या पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, एकुण 32 पदांवर नियुक्ती होणार आहे. या पदांवर अर्जाची प्रक्रिया 26 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत पोर्टल mphc.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.