Mumbai High Court | ‘कोरोना काळात लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत’; जाणून घ्या उच्च न्यायालयानं नेमकं काय सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या मामखुर्द येथील देवनार कत्तलखान्यात बकरी ईदसाठी जनावरांची कत्तल करण्याच्या मर्यादेत वाढ करावी. अशी मागणी मंगळवारी (20 जुलै) मुंबई हाय कोर्टाने फेटाळले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांच्या जीवापेक्षा कुठलाही धार्मिक सण महत्वाचा नाही असं हाय कोर्टाने (Mumbai High Court) स्पष्ट केलं आहे. तर अशी टिपणी देत मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, भिवंडी निझामपूर महापालिकेला (Bhiwandi Nizampur Municipal Corporation) दणका देत बकरी ईद निमित्त 3 दिवसांसाठी तात्पुरते कत्तलखाने सुरू करण्यास दिलेल्या परवानगीला स्थगिती दिलीय. तसेच, प्रदुषण नियामक मंडळ, पशुवैद्यकीय विभाग आणि कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही महापालिका आयुक्तांनी ही परवानगी दिलीच कशी असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) विचारला आहे.

Mumbai High Court | religious festivals are not more important than people s lives in corona period says bombay high court

मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) बकरी ईद निमित्त देवनार कत्तलखान्यात मोठ्या जनावरांची कत्तल करण्याविषयी मुंबई पालिकेनं अधिकाधिक 300 गुरांची मर्यादा वाढवून हजार अथवा किमान सातशे करावी अशी विनंती करत ऑल इंडिया जमैतुल कुरेश (Jamaitul Qureshi) यांच्यावतीनं जनहित याचिका दाखल केली होती. यावर कोर्टात आज सुनावणी झाली. त्यावेळी सद्यास्थिती पाहता सार्वजनिक आरोग्य हे कोणत्याही धर्मापेक्षा महत्वाचं आहे का? असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. तर सदर नियम हे मागील अनुभवांवरून आणि सद्यस्थिती लक्षात ठेवून केले आहे. तसे न केल्यास पुढच्या वेळेस प्रशासन व्यवस्थापन देखील करू शकणार नाही, असा कोर्टानं सांगितलं आहे.

बकरी ईद निमित्तानं गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारीचा म्हणून उपाय म्हणून जनावरांच्या
संख्येवर देखील निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्यावतीने अ‍ॅड. अनिल साखरे
(Adv. Anil Sakhre) यांनी उच्च न्यायालयात दिली. तसेच गेल्या वर्षी दररोज फक्त 150
जनावरांसाठी मूभा देण्यात आली होती. तरी यावर्षी दुप्पट जनावरांची कत्तल करण्यास मूभा देण्यात
आली असून गर्दी टाळण्यासाठीच हे निर्बंध लादण्यात आल्याचं देखील ही साखरे यांनी सांगितलं
आहे.

या दरम्यान, आषाढीनिमित्त यंदा पंढरपूरच्या वारीवरही मर्यादा आहेत. तसेच पुढे हिंदू आणि मुस्लिम
बांधवांचं अनेक सण सुरु होत आहेत. याशिवाय गणपती आणि नवरात्रही बसतील. कोरोनाच्या
तिसर्‍या लाटेची खबरदारी म्हणूनच निर्बंध सर्वांवरच घालण्यात आल्याचं देखील साखरे यांनी स्पष्ट
केलं आहे. महापालिकेची ही बाजू ऐकून घेत त्यांच्या निर्णायात हस्तक्षेप करण्यास नकार देत उच्च
न्यायालयानं (Mumbai High Court) याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.

हे देखील वाचा

Actress Sagarika Sona Suman | ‘राज कुंद्रा म्हणाला ‘न्यूड ऑडिशन दे’, अभिनेत्री सागरिका सोना सुमनचा धक्कादायक आरोप

Raj Thackeray | ‘मी मास्क घालतच नाही’ असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी चक्क मास्क घातला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai High Court | religious festivals are not more important than people s lives in corona period says bombay high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update