मुंबई HC चा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले -‘राजकीय कार्यक्रम आवरा, तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा; काय करायचं ते आम्ही बघू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – देशात थैमान घातलेली कोरोनाची (corona) दुसरी लाट (second wave) आटोक्यात येत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना (Political Rallies) आवर घालण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ठाकरे सरकारला (Thackeray government) केली आहे. राज्यात कोरोना (corona) नियमांचे उल्लंघन होत असतानाही राज्य सरकार (State Government) काहीच का हालचाली करत नाही, असा सवाल न्यायालयाने केला आहे. जर तुम्हाला हे जमत नसेल, तर आम्हाला सांगा, असा इशाराही न्यायालयाने सरकारला दिला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राज्यात नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकारला ही जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर आम्हाला सांगा. मग पुढे काय करायच ते आम्ही बघू, अशा शब्दात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Datta) आणि न्या. जी.एस. कुलकर्णी (Justice G.S. Kulkarni) यांच्या खंडपीठाने सरकारला इशारा दिला आहे. बेकायदेशीर राजकीय सभा आणि कार्यक्रमांना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व यंत्रणांना कार्यरत करावे, असा सल्लाही न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांना दिला. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून झालेल आंदोलन (Movement) असो किंवा इतर राजकीय आंदोलन असो, राज्य सरकारने कुठल्याही आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे कोर्टाने म्हटले आहे.

आम्ही घरुन काम करतोय अन्…
कोरोनामुळे देशभरातील न्यायालय बंद आहेत. आम्ही स्वतः घरून काम करत आहोत. अशा परिस्थितीत राजकीय सभा आणि कार्यक्रम मात्र राजरोसपणे कसे सुरु आहेत, असा सवाल न्यायालयाने केला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने गर्दी जमेल अस कुठलंही कृत्य न करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

Web Title :- mumbai high court warns state government to control political rallies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू