राज्यासह मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात पावसाचा जोर कायम असून मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा भागाड मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्हात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात अधून-मधून पासाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तविली आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती.