हायकोर्टाचा निर्णय ! वाहनांवर ‘पोलीस’ लिहण्यास आणि ‘लोगो’ लावण्यास बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना खासगी गाडीवर ‘पोलीस’ लिहणे आणि ‘लोगो’ लावण्यास हायकोर्टाने बंदी घातली आहे. जर अशी पाटी लावली तर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१३ च्या कलम १३४ प्रमाणे संबंधीतावर कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक पोलीस आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावतात. कारवाई टाळण्यासाठी याचा वापर केला जात आहे. मात्र, आता या पुढे मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावता येणार नाही. जर अशी पाटी लावलेली दिसल्यास सबंधीतावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिले असून येत्या सात दिवसात कोणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांकडूनच पोलिसांवर कारवाई होताना पहायला मिळणार आहे. मात्र, वाहतूक पोलीस पाटी लावलेल्या वाहनांवर कारवाई करणार का असा प्रश्न आहे.

आरोग्यविषयक बातम्या 

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म