नगरसेवकाला होर्डींग प्रकरण पडलं महागात

मुंबई : वृत्तसंस्था – मुंबई महापालिकेच्या नगरसेवकाला आपल्याच वार्डात बेकायदा होर्डींग लावणे आणि कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करणे महागात पडले. याप्रकऱणी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला चक्क २४ लाखांचा दंड ठोठावला आहे. ही संपुर्ण रक्कम महापालिका आयुक्तांना झालेल्या घटनेची नुकसानभरपाई म्हणून पालिकेच्या तिजोरीत येत्या दोन महिन्यात भरावी लागणार आहे.

भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि केसरबेन पटेल यांनी जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे अंधेरीतील पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर होर्डींग्ज व बॅनर लावल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार वार्डातील कर्मचारी होर्डींग्ज काढण्यासाठी आले. त्यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी महापालिकेने अवमान याचिका दाखल केली होती. त्याचे फोटोही पुरावा म्हणून न्यायालयात दाखल केले.

याप्रकरणी भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी घडलेल्या घटनेची संपुर्ण जबाबदारी स्विकारत बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. त्यानंतर एकही बेकादेशीर होर्डींग लावणार नाही अशी लेखी हमी दिली. तर आठवड्यात एक दिवस आपल्याच वार्डात फिरून शाळा, मैदानं, हॉस्पीटल या परिसरात बेकायदेशीर होर्डींग शोधून त्याची रितसर तक्रार त्यांना करावी लागणार आहे. तसेच दोन महिन्यांनी पालिकेला केलेली नुकसानभरपाई व बेकायदेशीर होर्डींगच्या तक्रारी किती केल्या याची माहिती द्यावी लागणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like