‘कोरोना’मुळं आत्महत्या करण्याच्या नावानं घर सोडलं, पोलिसांना सापडला इंदूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत ‘मज्जा’ करताना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पतीनं पत्नीला कोरोना झाल्याचं सांगत कुटुंबाला संक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी कोविड सेंटरमध्ये भरती होण्याचं कारण सांगितलं आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फरार झाला. नवी मुंबईमधून ही अजब घटना समोर आली आहे. अखेर पतीसोबत काही संपर्क होत नसल्यानं पत्नी हैराण होत पोलिसांकडे गेली. तिनं पती बेपत्ता झाल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी या पतीला गर्लफ्रैंडसोबत इंदूरमधून अटक केली आहे.

एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, 24 जुलैला तळोजा येते राहणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीनं पत्नीला फोन केला आणि सांगितलं की, त्याला कोरोना झाला आहे. त्यानं असंही सांगितलं की, तो खूप त्रासात आहे आणि जीव द्यायला चालला आहे. हे ऐकून धक्का बसलेली पत्नी रडतच त्याला रोखू लागली. पण त्यानं फोन कट केला.

सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांनी सांगितलं की, या व्यक्तीनं त्याचा फोन स्विच ऑफ केला होता. दुसऱ्याच दिवशी त्याच्या मेहुण्याला भावोजीची बाईक वाशीच्या एका गल्लीत बेवारस पडलेली दिसली. बाईकवरच त्याचं हेलमेट, ऑफिस बॅग आणि पाकिट ठेवलं होतं. कुटुबांनं तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली.

वरिष्ठ पोलीस इंस्पेक्टर संजीव धुमल म्हणाले, “पोलिसांची टीम या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेली. वाशीच्या आजूबाजूच्या नाल्यात त्याचा शोध घेण्यात आला. सर्व कोविड सेंटर्समध्येही त्याचा शोध घेतला गेला. यानंतर त्याचा फोन सर्व्हिलांसवर लावण्यात आला. बराच शोध घेतल्यानंतर पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलं.

पोलिसांनी असंही सांगितलं की, “त्या व्यक्तीनं त्याच्या मोबाईलमधील पहिलं सीम बंद करून नवीन सीम टाकलं. पोलिसांना सर्व्हिलांसच्या माध्यमातून समजलं की, मोबाईल इंदूरमध्ये सुरू आहे. यानंतर पोलिसांची एक टीम इंदूरमध्ये दाखल झाली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, तो व्यक्ती त्याचं नाव आणि त्याची ओळख बदलून गर्लफ्रेंडसोबत भाड्याच्या एका घरात रहात होता.