Mumbai Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  शेतकऱ्यांच्या विकासाला विरोध नाही तर बागायती पट्ट्यातील शेती उद्धवस्त करीत जाणाऱ्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या (Mumbai Hyderabad Bullet Train) मार्गाला विरोध आहे. विकास झाला पाहिजे, याबद्दल दुमत नाही. रक्षसी महत्त्वकांक्षा बाजुला ठेवा. गोरगरीबांना मारुन विकास नकोच आहे. मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनचा (Mumbai Hyderabad Bullet Train) प्रकल्प आमच्यावर लादू नका. हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास आपण पहिले आत्महदन करु, असा इशारा राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) यांनी देत या प्रकल्पाला विरोध केला आहे.

 

मुंबई-हैदराबाद हाय स्पीट रेल्वेमार्ग बारामती (Baramati) इंदापूर ( Indapur) तालुक्यातून प्रस्तावित आहे.
या पार्श्वभूमीवर बाधीत शेतकऱ्यांची शुक्रवारी (दि.22) बारामती येथील मोरोपंत नाट्यगृहात बैठक घेण्यात आली.
यावेळी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी शाम चौगुले (Sham Chowgule), प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, डॉ. अर्पणा कांबळे, सत्यव्रत पांडे, प्राजक्ता कुलकर्णी उपस्थित होते.

 

पृथ्वीराज जाचक म्हणाले, बुलेट ट्रेनचा मार्ग हरित पट्ट्यातून नको.
या मार्गाऐवजी मुंबई हैदराबाद जुन्या मार्गालगतच बुलेट ट्रेनचा मार्ग न्यावा. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)
यांनी देखील हा पर्याय योग्य असल्याचे चर्चेदरम्यान सांगितल्याची माहिती जाचक यांनी दिली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर देखील याचा परिणाम होण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच नव्याने दिलेल्या अहवालात विशिष्ठ लोकांना लक्ष करण्यात आले आहे, हे संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

मुळशी पॅटर्न होण्याची भीती

 

यावेळी हेमंत निंबाळकर यांनी या प्रकल्पामुळे परिसराची अवस्था मुळशी पॅटर्न (mulshi pattern) प्रमाणे होण्याची भीती व्यक्त केली.
तर विक्रम निंबाळकर यांनी पालखी महामार्ग आणि बुलेट ट्रेन एकमेकांना क्रॉस होत असल्याने चुकीचा सर्व्हे केल्याचे मत व्यक्त केले.
तर काही जणांनी बाजारभाव कसा ठरवणार असा सवाल केला.

 

Web Title : Mumbai Hyderabad Bullet Train | farmers oppose proposed route mumbai hyderabad bullet train

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यामधील पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुढील 4 वर्षांमध्ये पुर्ण करणार; सोमवारपासून सर्वेक्षण सुरु होणार

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रीजवर सलग तिसऱ्या दिवशी अपघात ! ट्रकने 8 वाहनांना धडक दिल्याने दोन महिला जखमी (व्हिडिओ)

Mumbai Cruise Drugs Case | ‘ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही’; चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेला समीर वानखेडेंनी सुनावलं