नितेश राणे म्हणतात , ‘मराठा आरक्षण निकालाच्या विरोधात कोणी सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई हायकोर्टात गुरुवारी मराठा आरक्षणाचा निकाल लागला. यावेळी हायकोर्टाने राज्य सरकारकडून देण्यात आलेलं मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या निर्णयात हायकोर्टाने शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण वैध आहे असं म्हटलं आहे. यासंदर्भातल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळून लावताना आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या
मागास असल्याचं सांगत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा कायदा कोर्टाने वैध ठरवला आहे.

मात्र या आरक्षणाविरोधात काही संघटना किंवा व्यक्ती सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. मात्र आता यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, हायकोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध कोण सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल, तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे मराठा समाजाने काळजी करू नये.

मराठा आरक्षणाला अखेर मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली यामध्ये मात्र सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आरक्षणावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आज राज्य सरकार आरक्षणावर स्थागिती न येण्यासाठी कॅव्हेट दाखल करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

एका महिन्यात घटवा ५ किलो वजन, करा ‘हे’ उपाय

महिलांनो, आनंदी व तणावमुक्त जीवनासाठी करा या आठ पद्धतींचा अवलंब

चेहऱ्यावर काळे डाग आहेत का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास