फिल्म कंपन्यांनी केली 350 कोटी रूपयांच्या टॅक्सची चोरी, तापसीकडे आढळून आले 5 कोटी रूपये रोखीनं घेतल्याचे पुरावे – IT

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही लोक आणि कंपन्यांवर प्राप्तिकर विभाग छापे मारून त्यांची चौकशी करत आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, तपासा दरम्यान या प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्न आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरीचे पुरावे मिळाले आहेत. माहितीनुसार, विभागाने म्हंटले की, आयकर विभागाला 350 कोटी रुपयांच्या टॅक्समध्ये गडबड केल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीचे अधिकारी सुमारे 350 कोटी रुपयांच्या बाबतीत कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. त्यात तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटींची कॅश रिसिप्ट मिळाली आहे, ज्याचा तपास सुरु आहे.

प्राप्तिकर विभागाने सांगितले की 3 मार्चपासून (बुधवार) मुंबईच्या 2 बड्या फिल्म प्रॉडक्शन हाऊस, एक अभिनेत्री आणि 2 टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या आवारात छापे टाकण्यात येत आहेत. हे छापे मुंबई, दिल्ली, पुणे आणि हैदराबादमध्ये सुरू आहेत. कार्यालये आणि निवासस्थानांसह एकूण 28 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

हिशेब देऊ शकले नाही अधिकारी 

छाप्यामध्ये फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या प्रत्यक्ष कमाईपेक्षा जास्त उत्पन्न असल्याचे पुरावे मिळाले आहेत. कंपनीचे अधिकारी अशा 300 कोटी रुपयांचा हिशेब देऊ शकले नाहीत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शेअर्स होर्डरच्या दरम्यान प्रॉडक्शन हाऊसमधील शेअर व्यवहाराची छेडछाड आणि कमी मुल्यांकासंदर्भातील पुराव्यात जवळपास 350 कोटी रुपयांची गफलत असल्याचे आढळले आहे त्यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे. याशिवाय खर्चाबाबतचे प्रमुख प्रॉड्यूसर्स, दिग्दर्शकांकडून खर्चांबाबत फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यासह जवळपास 20 कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. अभिनेत्री तापसी पन्नूच्या बाबतीतही असेच दिसून आले आहे.

डिजिटल डिव्हाइस बॅकअप ठेवतेय विभाग

दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या कार्यालयाच्या आवारात, ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, हार्ड डिस्क इत्यादी स्वरूपात प्रचंड प्रमाणात डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे, ज्याची चौकशी चालू आहे. शोधादरम्यान, 7 बँक लॉकर आढळले आहेत, ज्यांची चौकशी चालू आहे. सर्व कॅम्पसमध्ये शोध सुरू आहे. माहितीनुसार, आयकर विभागानेही याची पुष्टी केली आहे की आरओसी रेकॉर्डनुसार फॅन्टम फिल्म्स अद्याप कार्यरत आहेत आणि छापा दरम्यान सापडलेल्या तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, कंपनीचे भागीदार अजूनही आहेत. डिजिटल डेटा सिद्ध करतो की त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वित्त आणि कर चुकवणे करण्यात आले. विभागातील एक पथक सध्या शूटच्या ठिकाणी आहे जिथे अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू एका प्रकल्पात काम करत होते. सर्च ऑपरेशन आणि चौकशी अजूनही सुरू आहे. सर्च ऑपरेशन दरम्यान विभाग सर्व डिजिटल उपकरणांचे बॅकअप ठेवत आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅप चॅटचाही बॅक अप घेतला जात आहे, ज्याची नंतर चौकशी केली जाईल. माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान त्यांना पुष्कळ पुरावे सापडले आहेत.